कर्नाटक निवडणुकीने देशात परिवर्तनाची नांदी : पृथ्वीराज चव्हाण

कर्नाटक निवडणुकीने देशात परिवर्तनाची नांदी : पृथ्वीराज चव्हाण

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  देशात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून कोणताही विकास झाला नाही. उलट महागाई, बेकारी, बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढला आहे. याला चोख प्रत्युत्तर कर्नाटकच्या नागरिकांनी भाजपला दिले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोची जादू चालली नाही. कर्नाटकच्या निवडणुकीमुळे खर्‍या अर्थाने परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे, असे मत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवारी महानिर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री, दिग्गज नेत्यांनी उपस्थित राहून मोदी सरकारवर सडकून टीका केली.

यावेळी व्यासपीठावर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , ज्येष्ठ नेते नसीम खान, मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप, आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, कर्नाटकप्रमाणे आगामी निवडणुकीत काँग्रेस तिन्ही राज्ये काबीज करेल, नागरिक भाजपला कंटाळले असून देशाला आता काँग्रेसशिवाय पर्याय राहिलेला नाही. सत्ता मिळवण्यासाठी भाजप काय करेल हे सांगता येत नाही. भाजप दिशाहीन पक्ष आहे. त्यांचे दक्षिणचे दार पूर्णपणे बंद झाले आहे. आपण मोदी सरकारला घालवले नाही तर देशात लोकशाही टिकणार नाही.
देशात पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आवश्यक आहेत. सोलापुरातून परिवर्तन होईल, अशीही चव्हाण यांनी भविष्यवाणी वर्तवली. काँग्रेस हा सोलापूरचा बालेकिल्ला झाला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना केले.

शिंदे यांनी पुन्हा केंद्रस्तरावर प्रतिनिधित्व करावे : ज्येष्ठ नेते नसीम खान

देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी खर्‍या अर्थाने सोलापूरचा विकास केला आहे. पुन्हा एकदा शिंदे यांनी पुन्हा केंद्रस्तरावर नेतृत्व करावे. त्यासाठी त्यांना सर्वांनी साथ दिली पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news