Famous Temples In Maharashtra | "महाराष्ट्राच्या मातीतील श्रद्धेची त्रिसंधी : पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूरचा भक्तीप्रवास"

Famous Temples In Maharashtra | महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतभरातून भाविक या मंदिरांत दर्शनासाठी गर्दी करत असतात.
Famous Temples In Maharashtra
Famous Temples In MaharashtraFamous Temples In Maharashtra
Published on
Updated on

Famous Temples In Maharashtra

मुंबई : महाराष्ट्रात भाविकांसाठी पूज्यस्थळांची रेलचेल असलेली ठिकाणं म्हणजे पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर आणि तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर! ही ठिकाणं भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा संगम घडवणारी आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतभरातून भाविक या मंदिरांत दर्शनासाठी गर्दी करत असतात.

Famous Temples In Maharashtra
Aashadhi Vari | ‘आषाढी वारी‘ सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर

पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे वारकरी संप्रदायाचे केंद्रस्थान आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्या भक्तीमार्गाला अनुसरून येथे असंख्य भाविक ‘पंढरीच्या वाटेवर’ निघतात. आषाढी व कार्तिकी एकादशीत लाखो भाविक येथे वारी करतात. ‘विठ्ठल-विठ्ठल’ असा जयघोष करत भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतात.

Famous Temples In Maharashtra
Maharashtra Covid 19 Cases | JN.1 व्हेरिएंटची लागण झपाट्याने, महाराष्ट्रात ८६ नवे कोरोना रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या ३८३ वर

स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट

स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील अनेकांचे श्रद्धास्थान आहे. अक्कलकोट येथील मंदिरात दररोज हजारो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी गर्दी करतात. स्वामी समर्थांचे वास्तव्य अक्कलकोट येथेच होते. येथे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जागेवर त्यांचे मंदिर उभे आहे. स्वामींची वाणी, कृपा आणि दर्शन भक्तांना आत्मिक शांतता देतात.

तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर

मराठ्यांचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी देवीचे मंदिर तुळजापूर येथे आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः देवीचे अनन्य भक्त होते. मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या मूर्तीला ‘सजीव’ मानले जाते. नवरात्रोत्सवात येथे विशेष उत्साह असतो. देवीच्या दर्शनासाठी महिला, वृद्ध, लहानथोर सर्वजण श्रद्धेने येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news