

Lamboti bridge closed
सोलापूर : सोलापूर - पुणे महामार्गावरील लांबोटी पूल मंगळवारी (दि.२३) रात्री 10 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सीना नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रात्रीपासून नागरिक अडकून पडले आहेत. आम्हाला आधी कल्पना दिली असती, तर आम्ही प्रवास टाळला असता, अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.
महामार्गावर दोन्ही बाजूंनी 10 ते 15 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या लांबोटी पूलाची पाहणी करत अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या सर्व बाबी तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला महापूर आला आहे. त्यामुळे अनेक रस्तेमार्ग बंद झाले आहेत. सोलापूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे बंद करण्यात आला आहे. पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक लांबोटी येथे वळविण्यात आली आहे. त्यामुळे पुलावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. बार्शी-कुर्डूवाडी मार्ग वाहतूक कोंडीमुळे ठप्प झाला आहे.