

Ajit Pawar Solapur Visit Surrounded by Villagers :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांचा दौरा केला. त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली आणि प्रशासनाला कडक शब्दात सूचना केल्या. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज सकाळी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत.
अजित पवार हे मुंगळी गावात पाहणी करण्यासाठी गेले असता तिथं नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. नागरिकांच्या गराड्यातच अजित पवार पूरपरिस्थिताचा आढावा घेत होते अन् माध्यमांना माहिती देत होते. यावेळी गावकऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे आपल्या भावना आणि व्यथा मांडल्या. अजित पवार यांनी यावेळी ज्यांचं खरंच नुकसान झालं आहे त्यांनाच मदत मिळणार असं देखील ठणकावून सांगितलं.
मुंगशी गावानं गेल्या अनेक वर्षात असा महापूर पाहिला नव्हता. इथले वयोवृद्ध नागरिकांनी याबाबतची माहिती सांगितली. अनेकांचा संसार उद्ध्वस्त झालाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील गावातील नागरिकांशी संवाद साधला.
मुंगशी गावातील एका महिलेनं या पुरामुळं आपलं घर कोसळलं असं अजित पवार यांना सांगितलं. यावेळी अजित पवार यांनी कुटुंबातील सर्वच व्यक्तींची विचारपूस केली. मुलगा पीएसआय आहे असंही या महिलेनं सांगितलं.
दरम्यान, अजित पवार यांनी प्रशासनाला पंचनामे त्वरित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी एक महिलेने तिचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. अजित पवारांनी महिलेला तुमचा व्यवसाय काय?, असा प्रश्न विचारला. तसेच तुला मुलं किती?, असा सवालही अजित पवारांनी सदर महिलेला विचारला.
यानंतर महिला आपल्या मुलांची संख्या आणि मुलं, मुली किती हे देखील साांगितलं. त्यावेळी आपल्या मिश्किल स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांनी मुलगा कितवा झाला अशी विचारणा केली. त्यावेळी महिलं पहिल्यांदा मुलगा झाल्याचं सांगितलं. त्यानंतर अजित पवार हसले अन् जाऊ दे आता असं म्हणाले. त्यानंतर उपस्थित नागरिकांना देखील हसू आवरलं नाही.