Knife Attack : वडदेगावात पैशाच्या वादातून चाकू हल्ला, एकाचा मृत्यू

भांडण सोडवण्यासाठी गेलेला गंभीर जखमी
 Crime News |
Knife Attack Pudhari File Photo
Published on
Updated on

Knife attack over money dispute in Vaddegaon, one dead

कामती : राहुल सोनवणे

मोहोळ तालुक्यातील वडदेगाव येथे पैशाच्या वादातून झालेल्या चाकू हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 27) सकाळी सुमारे 10.15 वाजता घडली. या प्रकरणी कामती पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या 24 तासांत दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे.

 Crime News |
Fire Officer Attack : अग्निशमन अधिकारी माळी यांच्यावर सुपारी देऊन हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल नरसू बागल (वय 31, रा. वडदेगाव) यांच्या शेतातील गडी महादेव गुंड यांनी संशयित आरोपी मंगेश सुरेश डोंगरे (रा. वडदेगाव) याच्याकडे काही पैशांची मागणी केली होती. या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून संशयित आरोपी डोंगरे याने मनात राग धरून आपल्या साथीदार समर्थ संजय जगताप (रा. बेगमपूर) याला सोबत घेत वडदेगाव-औंढी रोडवरील कॅनॉलजवळ फिर्यादी पक्षाला गाठले.

यावेळी संशयित आरोपींनी शिवीगाळ करत वाद उकरून काढला. त्यातून संतप्त झालेल्या मंगेश डोंगरे याने फिर्यादीचे भाऊ दत्ता नागनाथ बागल (वय 38) यांना “आज तुला जिवंत सोडत नाही” अशी धमकी देत धारदार चाकूने छाती व पोटावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या दत्ता बागल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

 Crime News |
Pandharpur Forest Officer Attack : महिला वन अधिकाऱ्यावर हल्ला; वाळू तस्करांवर होणार तडीपारीची कारवाई

दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या समाधान महादेव जाधव (वय 25, रा. इंचगाव) याच्यावरही संशयिताने चाकूने हल्ला करत त्याला कमरेजवळ व डाव्या हातावर गंभीर जखमी केले. त्याच्यावर सध्या सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तसेच, फिर्यादी विठ्ठल बागल हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावले असता संशयित आरोपी समर्थ जगताप याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दमदाटी केली. या प्रकरणी विठ्ठल बागल यांच्या तक्रारीवरून कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जकिकोरे, पोउनि दीक्षित व त्यांच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी मंगेश सुरेश डोंगरे, समर्थ संजय जगताप यांना अटक केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि जकिकोरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news