Solapur Accident : जुन्नरजवळ एसटी-कारमध्ये भीषण अपघात; दोन ठार, १८ जखमी

मृतांमध्ये मोहोळमधील बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याचा समावेश
Solapur Accident News
एसटी व कारमध्ये झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झालाPudhari News Network

पोखरापूर : ओतुरजवळ नगर -कल्याण राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस व कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कारमध्ये असणाऱ्या मोहोळमधील बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यासह त्याचा मित्र जागीच ठार झाला तर बसमधील १८ जण जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि.७) सकाळी साडेदहाच्या सुमारास मौजे ओतुर गावच्या हद्दीत (ता. जुन्नर जि. पुणे ) नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर वाघिरे कॉलेज समोरील चौकात घडली. महेश तानाजी गायकवाड (रा. विद्यानगर, मोहोळ) व प्रतीक अशोक शिर्के (रा. नारळा, पैठण) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

Solapur Accident News
Nashik Accident | गंगापूर धरण परिसरात पर्यटकांच्या कारचा अपघात, एकाचा मृत्यू

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ओतुर (ता. जुन्नर ) येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयजवळ आज सकाळी १० . ५० च्या दरम्यान मारुती सुझुकी ब्रिझा कार (क्र. एम.एच.४६ सी.एम.२१५५) व एस.टी बस ( क्रं एम.एच १४, बी.टी. ४२८०) समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील महेश गायकवाड व प्रतीक शिर्के हे दोघे मित्र जागीच ठार झाले. तर बसमधील उषा गणेश मंद्रीवाळ (रा.चाकण, मंगेश रामदास हिलम), रंजना मंगेश हिलम (रा.डिंगोरे ता.जुन्नर, जि.पुणे), अजिंक्य गोरख साठे, शुभम भानुदास हजारे, जालिंदर भाऊसाहेब रासकर (रा.पिंपळनेर, जि.अहमदनगर) स्मिता बुधवा किरके, सिता उजीत, महिमा सिलबानूस बागे, संगीता सुक्का टोपव (चौघी रा.ओडीसा), सोमनाथ दत्तात्रय डफेदार (रा.संगमनेर, जि.अहमदनगर) प्रज्वल योगेश पुजारी (रा. पु्णेवाडी ता. पारणेर), इर्षद कादर शेख (रा.पिंपळगाव तुर्क ता.पारनेर जि.अहमदनगर), चिमा मनेरा व पिंकी चिमा मनेरा (दोघे, रा. कावेसर, जि.ठाणे) पोर्णिमा अजय खोडदे, अजय धोंडीभाऊ खोडदे (रा. किनीता जि.अहमदनगर), अर्जून रामजी मेमाणे (रा.खिरेश्वर ता.जुन्नर जि.पुणे) हे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, हवालदार सुरेश गेंगजे, शाम सुंदर जायभाये, विलास कोंढावळे, मनोज कोकणी, अतुल भेके, पोलीस मित्र शुभम काशीद, सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना ओतूर आणि आळेफाटा येथील खाजगी व सरकारी रुग्णालय दाखल करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news