कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री भवानी मातेची मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापना

मंदिराला आकर्षक फुलांची सजावट
Tuljapur News
तुळजापूर मंदिराला करण्यात आलेली फुलांची सजावटPudhari Photo
Published on
Updated on

तुळजापूर, डॉ. सतीश महामुनी : कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री एक वाजता तुळजाभवानी देवीची श्रमनिद्रा पूर्ण झाली, चांदीच्या मुख्य सिंहासनावर तुळजाभवानी देवीची मूर्ती परंपरागत पद्धतीने विराजमान करण्यात आली. कोजागिरी पौर्णिमा यात्रा ही तुळजापूर देवस्थानाची वर्षभरातील सर्वात मोठी यात्रा असते. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तीन दिवस चाललेल्या वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये मध्यरात्री एक वाजता देवीची दसऱ्याच्या दिवशी शिलंगण झाल्यानंतर सुरू झालेली श्रमनिद्रा पूर्ण झाली. पाळीचे पुजारी दिनेश मलबा, सचिन परमेश्वर, आणि इतर पुजारी बांधवांनी परंपरागत पद्धतीने विधिवत मेनलेपण आणि नगरच्या मानकरी यांचे धार्मिक विधी पहाटे संपन्न झाले. देवीला अभिषेक पूजा घालण्यात आल्या त्यानंतर नित्यपचार पूजा करण्यात आली.

Tuljapur News
तुळजाभवानी मातेची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा

रात्री दोनच्या सुमारास दर्शन मंडप येथे उभे असलेल्या सर्व भाविकांना दर्शन देण्यास सुरुवात करण्यात आली. मागच्या दोन दिवसापासून मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दर्शनासाठी आहे. सकाळी पूजा झाल्यानंतर देवीची आरती संपन्न झाली. पौर्णिमेच्या निमित्ताने उच्च प्रतीच्या आकर्षक वेगवेगळ्या फुलांनी तुळजाभवानी देवीचे सिंहासन आणि गाभारा सजविण्यात आला. गुलाब आणि मोरपीस यांचा उपयोग या सजावटीमध्ये केलेला आहे. अत्यंत आकर्षक आणि देखणी केलेली ही फुलांची सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Tuljapur News
तुळजाभवानी मंदिरात दुसऱ्या माळेस नेत्रदीपक फुलांची सजावट

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजापुरात सात लाख भाविक दर्शन

आई राजा राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो जयघोषात लाखो भाविकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. महाद्वार दर्शन आणि घाटशील दर्शन करून लाखो भाविकांनी आपला कोजागिरीचा खेटा पूर्ण केला. दोन दिवस सुरू असलेली कोजागिरी पौर्णिमा मध्यरात्री एक वाजता तुळजाभवानी देवीची दसऱ्या दिवशी सुरू झालेली विधिवत आणि परंपरागत पद्धतीने देवीच्या मूर्तीची चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापद झाल्यानंतर दही दुधाचे अभिषेक घातले गेले. दरम्यान रात्री एक वाजता चरणतीर्थ पूजा झाल्यानंतर धर्मदर्शन आणि मुखदर्शन सुरू झाले सकाळपर्यंत सुमारे दोन लाख भाविकांनी तुळजाभवानीची दर्शन घेतले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news