सीना नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा, चालकाचा तलाठ्यावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

संबंधित ट्रॅक्टर चालकाविरूद्ध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
sand mafia attack solapur
सीना नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा, चालकाचा तलाठ्यावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्नFile Photo
Published on
Updated on

Illegal sand mining in Sina riverbed, driver attempts to put tractor on Talathi

पुढारी वृत्तसेवा : पाकणी

शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8:00 ते 8:15 च्या दरम्यान सीना नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक सुरू होती. यावेळी महसूल विभागाचे पाकणी येथील तलाठी शुभम घोडके व कोंडी मंडळ अधिकारी स्वामी यांनी वाहनाचा पाठलाग करत वाहन थांबवण्याचा प्रयत्‍न केला. यावेळी अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने तलाठी व मंडल अधिकारी यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला.

sand mafia attack solapur
Solapur News : स्वीकृत नगरसेवक निवडीवरून महापालिका सभेत प्रचंड गोंधळ

पाकणी येथील तलाठी व मंडलाधिकारी आपला जीव वाचवण्यासाठी दाट लोकवस्ती असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी आले असता त्यांचा पाठलाग करत ट्रॅक्टर चालक रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी वाळूने भरलेला ट्रॅक्टर घेऊन आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर वर्दळ होती. यावेळी ट्रॅक्टर चालक गर्दीचा फायदा घेऊन ट्रॅक्टर सोडून फरार झाला. त्या संबंधित तालुका पोलीस स्टेशन येथे अमर हरिदास गुंड राहणार शिवणी याच्यावरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास हेडकॉन्स्टेबल जगताप हे करीत आहेत.

sand mafia attack solapur
SSC Exam : नंदेश्वर केंद्रावर दहा बोगस विद्यार्थी पकडले

यावेळी पाकणी गावचे तलाठी शुभम घोडके कोंडी मंडळ अधिकारी स्वामी, तालुका पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल जगताप, पोलीस नाईक अशोप शेख, पो.कॉ. बळवंत तसेच पाकणी गावचे पोलीस पाटील तुकाराम पाटील कोतवाल दीपक चंदनशिवे आदी उपस्थित होते.

पाकणी येथील सीना नदीतून मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अवैधरित्या वाळूचा उपसा होत आहे. याविषयी पाकणी ग्रामपंचायतचे लोकनियुक्ती सरपंच बालाजी येलगुंडे यांनी या अगोदरच जिल्हाधिकारी, सोलापूर, प्रांतअधिकारी, सोलापूर, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशन उत्तर सोलापूर, डीवायएसपी, तहसिलदार उत्तर सोलापूर आधी ठिकाणी लेखी तक्रार दिलेली आहे. त्यावर संबंधितांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

आज घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असून यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी आजच्या घटनेतून पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर काय कारवाई करते याकडे संपूर्ण नागरिकांचे लक्ष लागले आहे.
- बालाजी सिद्राम येलगुंडे लोकनियुक्त सरपंच पाकणी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news