आषाढी वारीतील सेवासुविधांचा आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

आषाढी वारीतील सेवासुविधांचा आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर आषाढी वारीमध्ये वारकरी, भाविकांना देण्यात येणार्‍या सेवासुविधांबरोबरच सुरक्षा यासह अन्य बाबींचा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी आढावा घेतला. यावेळी प्रशासनास आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.

भक्तनिवास येथे आरोग्यमंत्री सावंत यांनी आषाढी वारी सेवासुविधांबाबत बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी उपस्थित होते. वारकर्‍यांना आवश्यक सेवासुविधा पुरविल्या जात आहेत. या सुविधांमध्ये कोणतीही उणीव राहू नये, विशेषतः महिलांच्या सेवासुविधा, सुरक्षा यांना प्राधान्य द्या, अशा सूचना आरोग्य मंत्री सावंत यांनी दिल्या.

वारीमध्ये नोडल अधिकार्‍यांची भूमिका महत्त्वाची आहे. अधिकारी, कर्मचारी यांच्यावर ज्या विभागाची जबाबदारी दिली आहे ती त्यांनी व्यवस्थित पार पाडावी. प्रशासन, पोलिस आणि आरोग्य विभागाने स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षात समन्वय ठेवावा. पोलिस विभागाने सुरक्षेसाठी आवश्यक राखीव दल तैनात ठेवावे. कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news