Morochi Gram Sevika Bribery Case | महिला ग्रामसेविका लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात! मोरोची ग्रामपंचायतीच्या पूजा लोंढेंना अटक

Morochi Gram Sevika Bribery Case | माळशिरस तालुक्यातील मोरोची ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका पूजा बाळू लोंढे (वय ३८) यांना अँटी करप्शन विभागाने लाच घेताना दि. १८ रोजी अटक केली आहे.
Morochi Gram Sevika Bribery Case
Morochi Gram Sevika Bribery Case
Published on
Updated on

नातेपुते | पुढारी वृत्तसेवा

माळशिरस तालुक्यातील मोरोची ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका पूजा बाळू लोंढे (वय ३८) यांना अँटी करप्शन विभागाने लाच घेताना दि. १८ रोजी अटक केली आहे. तक्रारदाराने केलेल्या कामाची बिले तसेच सुरू असलेल्या कामाची बिले काढण्यासाठी लोंढे यांनी ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

Morochi Gram Sevika Bribery Case
Maharashtra Board Exam 2026 | बोर्ड परीक्षेसाठी 'तिसरा डोळा' सज्ज! परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही रेकॉर्डिंग जतन करणे आता अनिवार्य

तडजोडीनंतर ही रक्कम ४६,५०० रुपये इतकी ठरली होती. त्यामधील पहिला हप्ता म्हणून २६,५०० रुपये स्वीकारताना महिला ग्रामसेविकेस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले व अटक केली आहे.

पडताळणीदरम्यान तक्रारदाराकडे त्यांनी केलेल्या कामाचे बिल काढल्याचा मोबदला तसेच सुरू असलेल्या कामाची प्रलंबित बिले काढून देण्यासाठी एकूण रकमेच्या ५ टक्के प्रमाणे लाचेची मागणी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. संबंधित ठेकेदार तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली. पंचासमक्ष २६,५०० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना पूजा लोंढे यांना रंगेहात पकडण्यात आले.

Morochi Gram Sevika Bribery Case
Solapur News: गवताळ सफारीत नीलगायींची संख्या वाढली

या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया संध्याकाळपर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (एसीबी पुणे), अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत शैलेश चंद्रकांत पवार (पोलीस निरीक्षक), पोलीस हवालदार सलीम मुल्ला, पोलीस हवालदार स्वामीराव जाधव, महिला पोलीस शिपाई प्रियांका गायकवाड, चालक पोलीस हवालदार राहुल गायकवाड यांनी सहभाग घेतला.

लोकसेवक, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

— प्रशांत चौगुलेपोलीस उपअधीक्षक,एसीबी सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news