Solapur News: गवताळ सफारीत नीलगायींची संख्या वाढली

बोरामणी : वावर असलेल्या वन्य प्राण्यांमध्ये नीलगाय, हरीण, ससा आदींचा समावेश
Solapur News
Solapur News: गवताळ सफारीत नीलगायींची संख्या वाढलीPudhari
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर शहरापासून अगदीच जवळ असलेल्या बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील गवताळ सफारीत नीलगाय या वन्य प्राण्यांसह हरीण, ससा, लांडगे यांचा वावर वाढला आहे. यातील काही वन्य प्राण्यांमुळे शेतीचे, पिकांचे नुकसानही होत आहे. वन्यजीव क्षेत्रात आढळणारे लाजाळू प्राणी म्हणून नीलगायची ओळख आहे. तृणभक्षी हरिण कुळातील नीलगाय हे वाघ व बिबट्या यांचे खाद्य आहे. सायंकाळी उशिरा व रात्री हे प्राणी वनक्षेत्र ओलांडूनही शेतात जातात आणि शेतातील पिकेही खातात. अतिशय कमी काळात याची संख्या वाढते. हा प्राणी रुबाबदार, सुंदर व दिसायला डौलदार आहे. नीलगाय बोरामणीतील गवताळ सफारीचे महत्त्व वाढविणारी आहे.

बुध्द पौर्णिमेच्या रात्री वन्य प्राण्यांची गणना केली जाते. या गणनेतसुध्दा वन्य प्राण्यांची निश्चित अशी संख्या मिळत नाही. त्या पौर्णिमेच्या रात्री विविध सर्वच वन्य प्राण्यांसह पक्षांचीही गणना केली जाते. यात अनेक प्राणी भटकत असतात. अशाच भटकंतीतून त्यातील काही प्राणी स्थलांतरही करतात. यामुळे एकाच भागातील निश्चित अशी संख्या उपलब्ध होत नसते. -
रोहितकुमार गांगुर्डे, वन परिक्षेत्र अधिकारी दक्षिण सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news