Gold Silver Rates: सोन्या-चांदीच्या दरात घसरण

२४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १ लाख ५६ हजार ३८० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४३ हजार ९८० रुपये
Gold-Silver Rate Today
Gold-Silver Rate TodayPudhari
Published on
Updated on

सोलापूर : सराफ बाजारात गुरुवारी (दि.२७) सोन्या-चांदीच्या दरात घसरण पहायला मिळाली. २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १ लाख ५६ हजार ३८० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४३ हजार ९८० रुपये होता.

बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ५८ हजार २०० रुपये होता. त्यामुळे एका दिवसात २४ कॅरेट सोन्याच्या दरात १ हजार ८२० रुपयांची घट झाली. २२ कॅरेटच्या दरातही घट झाली आहे. चांदीच्या दरातही घसरण झाली. गुरुवारी चांदीचा दर २ लाख ४७ हजार रुपये प्रतिकिलो होता. बुधवारी हा दर २ लाख ५१ हजार रुपये प्रतिकिलो होता. त्यामुळे चांदीच्या दरात प्रतिकिलो ४ हजार रुपयांची घट झाली.

जागतीक आर्थिक अस्थिरतेचा थेट परिणामामुळे आगामी काळातही दरामध्ये चढ-उतार राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली

सोने-चांदीच्या दरांमध्ये सध्या अनिश्चितता असून दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्यामुळे ग्राहकही खरेदीचा निर्णय घेताना द्विधा मनस्थितीत आहेत. बाजारात ग्राहकांची संख्या आणि खरेदीचे प्रमाण कमी असल्याने सध्या सराफा बाजारात मंदीची स्थिती आहे.
- रोशन वेरणेकर, सोने व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news