Girish Mahajan Nashik | पालकमंत्रीपदी निवड म्हणजे विठ्ठलच पावला!

Girish Mahajan Nashik | जलसंपदामंत्री गिरीश महाजन; पत्नीकडून बातमी समजली, यंदाचा कुंभमेळा ऐतिहासिक होईल
Girish Mahajan Nashik | पालकमंत्रीपदी निवड म्हणजे विठ्ठलच पावला!
Published on
Updated on

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा
श्री विठ्ठलाचे दर्शन घेताना नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतची बातमी मला पत्नीकडून समजली. पालकमंत्रीपदी निवड झाल्याने मला विठ्ठलच पावला, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

Girish Mahajan Nashik | पालकमंत्रीपदी निवड म्हणजे विठ्ठलच पावला!
Pune Solapur Road Traffic: सोलापूर रस्त्यावरील कोंडी सुटणार? जंक्शन सुधारणेसाठी महामेट्रोचा २७५ कोटींचा आराखडा

मंत्री महाजन यांनी सोमवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आषाढी वारी काळात मी पंढरपुरात उपस्थित राहून सेवा बजावली आहे.

मतदारसंघातील भाविकांची सेवा बजावत आहे. त्याचेच फळ मला विठ्ठलाने दिले आहे. योगायोग बघा, सोमवारी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जवळपास १५-१६ हजार भाविकांबरोबर आलो आहे. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत असताना नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून निवड झाली.

Girish Mahajan Nashik | पालकमंत्रीपदी निवड म्हणजे विठ्ठलच पावला!
Jalyukt Shivar Scheme: ‘जलयुक्त शिवार’ मधून सोलापूर जिल्ह्यात २४०५ हेक्‍टर सिंचनाखाली येणार

राज्यात १७ महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. यात एकही महापालिका ठाकरे-राऊत यांना जिंकता आली नाही. त्यांचा एकही जिल्हा परिषद अध्यक्ष नाही. आहेत ते खासदार, आमदार त्यांना सोडून गेले.

जात आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय कामे केली हे बाहेर काढायला लावू नका. लोकांनी तुम्हाला दूर केले आहे. खा. संजय राऊत यांच्या बडबडीला लोक कंटाळले आहेत. राऊत यांच्या जिभेला हाड नाही. ते वायफळ बडबड करतात, अशी टीकाही मंत्री महाजन यांनी केली.

कुंभमेळ्यास दहा कोटी भाविक येतील

यंदाचा कुंभमेळा ऐतिहासिक होईल. गतवेळेस अडीच कोटी भाविक आले होते. यावेळेस दहा कोटी भाविक येतील, असे नियोजन करण्यात येत आहे. कुंभमेळामंत्री मी होतोच. पण, पालकमंत्री पदामुळे आता कुंभमेळ्याचे नियोजन अधिक चांगले होईल, असेही मंत्री महाजन म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news