Jalyukt Shivar Scheme: ‘जलयुक्त शिवार’ मधून सोलापूर जिल्ह्यात २४०५ हेक्‍टर सिंचनाखाली येणार

सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या ३५७२ कामांसाठी ९५.१५ कोटी रुपये निधी निश्चित केला आहे
Jalyukt Shivar Scheme
Jalyukt Shivar Scheme
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या ३५७२ कामांसाठी ९५.१५ कोटी रुपये निधी निश्चित केला आहे. या कामांमुळे ६२३७.९१ टीसीएम पाणीसाठा निर्माण होऊन २४०५.८३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यातून शेतीला शाश्वत सिंचनसाठा उपलब्ध होणार आहे.

सन २०१४ ते २०१९ या कालावधीत पहिल्या टप्पा जलयुक्त शिवार अभियान राबविल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातही ते राबविले जात आहे. ही योजना मृद व जलसंधारण विभाग, कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा, वन विभाग व जलसंपदा विभागांच्या सह यांचा सहभाग आहे.

जलतारा योजनाही राबविले जात असून, त्यातून ३७६ कामे मंजूर असून १५५ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अमृत सरोवरांतर्गत मंगळवेढा तालुक्यात ७ कामे मंजूर झाली आहेत. वैयक्तिक लाभार्थी उत्पादन पद्धतीसाठी ३.२३ कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी ९१.८३ टक्के खर्च झाला आहे.

जिओ टॅगिंग बंधनकारक

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे करत असताना यंत्रणांनी जलयुक्तमधील कामांचे जिओ टॅगिंगचे फोटो आठ दिवसांत अपलोड करावेत, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेंतर्गत सुरू असलेली नऊ कामे पावसामुळे बंद आहेत. पावसाळा संपल्यानंतर ती कामे सुरू केली जातील.
- राहुल क्षीरसागर, जिल्हा जलसंधारण अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news