

पोखरापूर : मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२१ ठिकाणी सार्वजनिक गणपती प्रतिष्ठापना तर ४६ ठिकाणी एक गाव एक गणपती अशी संकल्पना राबवण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त नियोजन करण्यात आले आहे. १ पोलीस निरीक्षक, ३ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक, ४० पोलीस अंमलदार, ३० होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
यावर्षी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून नो डीजे या आवाहनाला प्रतिसाद देत मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुकीसाठी पारंपारिक वाद्यांचा वापर करण्याचे आश्वासन दिले आहे. गणेशउत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २९ गुन्हेगारी प्रवृत्ती इसमांना तालुक्यामधून तडीपार प्रस्ताव नुसार कारवाई करण्यात आली असुन अवैध धंदे, भांडण तक्रारी करणाऱ्या जवळपास १०० जणांचे चांगल्या वर्तणूकीचा बॉन्ड घेऊन कारवाई करण्यात आली आहे.
तसेच प्रत्येक मंडळांना नोटीस देऊन उत्सवाच्या अनुषंगाने आचार संहिता व नियमांचे काटेकोरपणे करावे तसेच ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करू नये या करीता सूचना देण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या आपले दिवशी मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मिरवणूक काढण्यात येणार आहेत. तर दिवशी ६२ गणेश मंडळांच्या मिरवणूक काढण्यात येणार आहेत. डीजे बंदी मुळे मिरवणूक रद्द करत सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अनेक सार्वजनिक मंडळांनी दिली. मोहोळ शहरात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती व इतर साहित्य खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला असून २९ गुन्हेगारी प्रवृत्ती इसमांना तालुक्यातुन तडीपार तर १०० जणांचे चांगल्या वर्तणुकीचे बॉण्ड घेण्यात आल्याची माहिती मोहोळ पोलिसांकडून देण्यात आली.