सिद्धेश्वर, चेन्नई, होसपेट एक्स्प्रेससह चार गाड्यांना साडेतीन तासांचा विलंब

कल्याण स्थानकात घसरला लोकलचा डबा; प्रवाशांचे हाल
Four trains including Siddheshwar, Chennai, Hospet Express delayed by three and a half hours
सिद्धेश्वर, चेन्नई, होसपेट एक्स्प्रेससह चार गाड्यांना साडेतीन तासांचा विलंब Railway File Photo
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) जाणार्‍या लोकलचा डबा शुक्रवारी (दि. 18) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घसरला. या घटनेचा मुंबईहून सोलापूरकडे येणार्‍या सर्वच गाड्यांवर परिणाम झाला. यात मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर, मुंबई-चेन्नई या गाड्यांना साडेतीन ते पावणे चार तास, मुंबई-होसपेट दीड तास तर मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेस तब्बल अडीच तास सोलापूरला उशिराने पोहचल्याने प्रवाशांचे हाल झाले.

Four trains including Siddheshwar, Chennai, Hospet Express delayed by three and a half hours
सोलापूर : हॉलीबॉल स्पर्धेत 'नागनाथ'च्या मुलींची बाजी

दरम्यान, कल्याण स्थानकातून मुंबईकडे निघालेल्या लोकलचा डबा घसरल्याने फलाटावर प्रवाशांचा गोंधळ उडाला. या घटनेमुळे मुंबई स्थानकात सोलापूरकर प्रवासी अडकून पडले. यापूर्वी देखील अनेकदा रुळावरून लोकल, मेल, एक्स्प्रेस तसेच मालवाहतूक गाड्या घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकलचा डबा घसरल्याने मेल, एक्स्प्रेस गाड्या त्या-त्या ठिकाणी थांबविण्यात आल्या तर काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news