मराठा आरक्षणासाठी माजी नगरसेवक बलभीम राखुंडे यांनी जीवन संपविले

Balbhim Rakhunde | करमाळा शहर, तालुक्यात शोककळा
Balbhim Rakhunde
करमाळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक बलभीम उर्फ दादा राखुंडे यांनी जीवन संपविले. Pudhari News Network
Published on
Updated on

करमाळा: पुढारी वृत्तसेवा : करमाळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम उर्फ दादा राखुंडे (वय ८०, रा. कानड गल्ली, करमाळा) यांनी मराठा आरक्षणासाठी शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी चिट्टीद्वारे करत राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. आज (दि.२३) सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मराठा आरक्षण मिळावे व आपला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे, असे पत्र लिहिलेले सापडले. बलभीम राखुंडे हे पूर्वीपासूनच मराठा समाजाच्या चळवळीत सक्रिय होते. ते अनेक आंदोलने, मोर्चे यामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी वेळोवेळी राजकारणात या कारणास्तव बंड केले होते. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून ते अलीकडे निराश होते.

त्यांनी लिहिलेल्या चिट्टीमध्ये मराठा आरक्षण मिळत नाही, म्हणून आपण जीवन संपवत असल्याचे नमूद केले आहे. याबाबत कोणीही तक्रार करू नये, असा ही उल्लेख केला आहे. मराठा आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा असल्याचेही त्यांनी लिहिले आहे. करमाळा शहर व तालुक्यात शोककळा पसरली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

Balbhim Rakhunde
Manoj Jarange Nashik | मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी शहरातील वाहतुक मार्गात बदल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news