नगोर्ली येथील विहिरीत पाय घसरून सेवा संस्थेचे माजी चेअरमन यांचा मृत्यू

डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू
Death of Kailas Navale
नगोर्ली येथील विहिरीत पाय घसरून सेवा संस्थेचे माजी चेअरमन यांचा मृत्यू झाला.Pudhari News Network

टेंभुर्णी: पुढारी वृत्तसेवा : माढा तालुक्यातील नगोर्ली येथील विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन कैलास विठ्ठल नवले (वय, ४२) यांचे विहिरीतील विद्युतपंप सुरू करताना पाय घसरून पडल्याने डोक्यास गंभीर मार लागून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२८) दुपारी १.३० च्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Death of Kailas Navale
सोलापूर : ढाब्यावर दारू पिणे पडले महागात

कैलास नवले हे नेहमीप्रमाणे शेतातील विद्युतपंत सुरू करण्यासाठी दुपारी विहिरीवर गेले होते. यावेळी ते पाय घसरून खोल विहिरीत टप्प्यावरील खडकावर पडले. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने व रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली. पोलीस बिरुदेव हजारे, राजेश लांडगे घटनास्थळी दाखल झाले.

Death of Kailas Navale
सोलापूर: मोहोळ येथे दोन कारची धडक: १ जण ठार

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, तीन भाऊ असा परिवार आहे. ते माजी सरपंच चंद्रकांत नवले व राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ नवले यांचे बंधू होत. नवले हे हरहुन्नरी कार्यकर्ते म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने शोककळा पसरली आहे. चंद्रकांत नवले यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news