सोलापूर : ढाब्यावर दारू पिणे पडले महागात

ढाबा चालकासह तिघांना न्यायालयाने ठोठावली शिक्षा
raid by State Excise Department
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने छापा टाकला.Pudhari File Photo

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने तांबवे (ता. माळशिरस)च्या हद्दीतील हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात न्यायालयाने सोमवारी धाबामालक व दोन मद्यपी ग्राहकांना एकूण सत्तावीस हजारांचा दंड ठोठावला.

raid by State Excise Department
पंतप्रधान मोदी जनादेश नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत : मल्लिकार्जुन खर्गे

हॉटेल महालक्ष्मी धाब्यावर धाड

गुरुवारी दुय्यम निरीक्षक अकलूज बाळू नेवसे यांचे पथकाने अकलूज-टेंभुर्णी रोडवरील तांबवे गावाच्या हद्दीतील हॉटेल महालक्ष्मी धाब्यावर धाड टाकली. ढाबामालक शंकर नुस्ते (वय 26) हा मद्यपी ग्राहक किरण भोसले (वय 43) व शरद गेजगे (वय 27) यांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध केल्याचे आढळले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने घटनास्थळावरून सुमारे 180 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या चार बाटल्या व विदेशी दारूच्या तीन बाटल्या व काचेचे ग्लास असा एकूण 740 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी धाबा मालक शंकर नुस्ते व ग्राहक किरण भोसले, शरद गेजगे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला.

raid by State Excise Department
Ajinkya Rahane : दिसणार नव्या क्रिकेट संघासोबत

तिन्ही आरोपींनी दंडाची कारवाई

तिन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माळशिरस आलोक देशपांडे यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने धाबा मालकास पंचवीस हजार रुपये दंड तसेच दंड व ग्राहकांना प्रत्येकी एक हजार दंडाची शिक्षा सुनावली. तिन्ही आरोपींनी दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आवेज शेख, जवान गजानन जाधव, तानाजी जाधव व वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली. गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर जिल्हायत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news