Tea: शरीर थंड ठेवण्यासाठी पाच लाभदायक चहा

उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे
Tea
Tea Canva
Published on
Updated on

सोलापूर : उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. याशिवाय पुदिना, ग्रीन, जास्वंद, बडीशेप आणि धने घातलेला चहा असे पाच प्रकारचे चहा घेतल्यास व कोथिंबीरचे पाणी पिल्यास या दिवसातही आपले शरीर थंड राहू शकते. दुपारी बारा ते चार यादरम्यान दूध पचनाला जड असल्याने दुधाचा चहा घेणे टाळणे योग्य ठरेल.

उन्हाळ्यात मानवी शरीरातील पाणी कमी होत असते. ते कमी होऊ नये. व शरीरातील पाण्याचे सरासरी प्रमाण टिकून राहावे यासाठी व पचनाला मदत करणारे विविध प्रकारच्या चहाचा पर्याय उपलब्ध आहे.

पुदिना चहा : पुदिनामध्ये नैसर्गिक मेंथल असतो जो शरीर थंड ठेवतेो. अपचनासह गॅसवर गुणकारी. यासाठी सहा पुदिन्याची पाने गरम पाण्यात पाच मिनिटे उकळून घ्या. थोडे लिंबू पिळा.

ग्रीन टी : अँटीऑक्सिडंट हे शरीरातील पेशींचे संरक्षण करणारे घटक आहेत. उन्हामुळे होणारे त्वचेचे नुकसान कमी करते. चयापचय वाढवतो पण यात कॅफिन कमी असते. कोमट किंवा थंड करून प्या, गरम पिणे टाळा. दिवसातून दोन कप पुरेसे.

बडीशेप चहा : पोट थंड ठेवतो, ॲसिडिटी व उष्णतेमुळे होणारे पोटाचे त्रास कमी करतो. तोंडाची दुर्गंधीही जाते. एक चमचा बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्या, किंवा गरम पाण्यात उकळून घ्या.

हिबिस्कस व जास्वंद चहा : रक्तदाब नियंत्रित ठेवतो व शरीराचे तापमान कमी करतो. यात व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते. रंगाने लाल, चवीला आंबट-गोड. उन्हाळ्यात थंड चहा म्हणून बेस्ट.

धन्याचा चहा व कोथिंबीर पाणी : शरीरातील उष्णता व हानिकारक विषारी घटक बाहेर काढतो. लघवी साफ होऊन शरीर शुद्ध करते व यामुळे डिटॉक्स होतो. एक चमचा धने कुटून पाण्यात उकळून प्या.

साखर कमी : साखरेने शरीरात उष्णता वाढते. गुळ किंवा मधाचा चहा घ्या, तोही कमी असलेला घ्या.

दूध चहा टाळा : दुधाचा चहा पचायला जड आणि उष्ण असतो. शक्यतो काळा आणि औषधी वनस्पतींपासून बनवलेले, वनस्पतीजन्य किंवा वनौषधी चहा घ्या. सध्या उन्हाळा तीव्र असून या दिवसात शरीर थंड राहणे

गरजेचे आहे. ते थंड राहावे, यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यकच आहे. यासाठी पाणीयुक्त फळे खाणे गरजेचेच आहे. याशिवाय पुदिना, धने, जास्वंद, बडीशेप आणि ग्रीन टी यासारखे औषधी वनस्पतीयुक्त व कमी साखरेचा असलेल्या चहानेही शरीर थंड राहू शकते.
- डॉ. सीमा क्षीरसागर, निवासी वैद्यकीय अधिकारी, विमा रूग्णालय, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news