Solapur News | अंदाज समितीच्या आमदारांनी केम येथील कुंकू कारखान्यांची केली पाहणी

हिंगोलीचे आमदार हेमंत पाटील व परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली भेट
Kem Kumkum Factories Inspection
Kem Kumkum Factories InspectionPudhari
Published on
Updated on

Kem Kumkum Factories Inspection

केम: सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या अंदाज समितीच्या आमदारांनी केम येथील कुंकू कारखान्यांची पाहणी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार तथा विधान परिषद आमदार हेमंत पाटील व परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, ग्रामसेवक वैभव तळेकर यांच्यासह कुंकू कारखानदार व केम ग्रामस्थ उपस्थित होते.

केम गावाला कुंकू उत्पादनाची ऐतिहासिक व पारंपरिक ओळख असून गावात सुमारे २५ कुंकू कारखाने कार्यरत आहेत. या उद्योगातून सुमारे ३०० ते ४०० नागरिकांना रोजगार मिळत आहे. मात्र, रस्त्यांची दुरवस्था, रेल्वेची बंद झालेली पार्सल सुविधा, प्रलंबित श्री ऊत्तरेश्वर औद्योगिक वसाहत इतर शासकीय विभागांच्या अटी-शर्तींमुळे गेले २६ वर्ष झाले रेंगाळली आहे. उद्योगांच्या विकासाला अडथळे निर्माण होत असल्याचे ग्रामस्थ व कारखानदारांनी निदर्शनास आणून दिले.

Kem Kumkum Factories Inspection
Solapur News: सोलापूर अस्वच्छ; सांडपाणी, घनकचऱ्याचा निधी जातो कुठे?

यावेळी केमला जोडणारे प्रमुख रस्ते सुधारावेत, श्री ऊत्तरेश्वर औद्योगिक वसाहत प्रकल्पाला गती मिळावी, इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत तसेच केम रेल्वे स्थानकावर अधिक रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा आणि रेल्वे पार्सल सुविधा पुन्हा सुरू करावी, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या.

या सर्व प्रश्नांची दखल घेत आमदार हेमंत पाटील साहेब यांनी केमच्या उद्योग व विकासाशी संबंधित प्रश्न उद्योगमंत्री मा. उदय सामंत साहेब यांच्या निदर्शनास आणून देऊन उपलब्ध सुविधांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. केम गावात उद्योगधंदे वाढावेत, स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन त्यांनी दिले.

Kem Kumkum Factories Inspection
Solapur News : विधिमंडळ अंदाज समितीने अधिकाऱ्यांना धरले धारेवर

यावेळी कुंकू कारखानदार गोडसे आण्णा, संदेश गोडसे, गोरख खानट, धनंजय सोलापूरे, कृषी सहाय्यक प्रवीण दगडे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब बिचितकर, प्रहार संघटना करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, बापू तळेकर, सागर दोंड, ग्रामपंचायत सदस्य गोरख पारखे, सागर कुरडे, उपसरपंच शरद वायभासे, रंदवे गुरुजी, महादेव लोंढे , माणिक पाटील सर यांच्यासह केम गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news