Dr. Smita Jadhav : पदवीधरांशी डॉ. स्मिता जाधव यांनी साधला संवाद

सोलापुरातील प्रचार दौऱ्यात घेतल्या विविध नेते, पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी
Dr. Smita Jadhav
Dr. Smita Jadhav
Published on: 
Updated on: 

सोलापूर : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी बुधवारी (दि.२१) सोलापुरात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटीगाठी घेत पदवीधर मतदारांशी संवाद साधला. धार्मिक स्थळांचे दर्शन, शैक्षणिक संस्थांना भेटी आणि राजकीय नेत्यांशी चर्चा अशा विविध माध्यमांतून त्यांनी प्रचार केला.

दौऱ्याची सुरुवात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडेय महामुनींच्या दर्शनाने झाली. त्यानंतर होटगी मठात काशी पीठाचे जगद्‌गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांचे आशीर्वाद घेतले. दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, श्री सिद्धेश्वर कृषी बाजार समितीचे सभापती दिलीप माने आणि श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांची त्यांनी भेट घेतली.

वालचंद शिक्षण समूहाचे डॉ. रणजित गांधी, दयानंद शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी आणि पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्याशीही उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी संवाद साधला. यावेळी पदवीधर व शिक्षक मतदारांशी संपर्क साधत निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली.

महायुतीतील सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांचीही डॉ. जाधव यांची भेट घेतली. या दौऱ्यात भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, नगरसेविका वृषाली चालुक्य, भाजप पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉ. शैलेश पाटील, डॉ. अमोल पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचार दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांना विविध क्षेत्रातून सहकार्य देण्याचे आश्वासन मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news