

करमाळा : ‘पदवीधर तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न सोडवणे आणि शिक्षकांच्या विविध अडचणींचा पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देणे हीच आमची मुख्य प्राथमिकता आहे. या निवडणुकीत गाफील न राहता गावागावांतील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून संवाद साधा,’ असे आवाहन डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी केले. करमाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पदवीधर व शिक्षक मतदार मेळाव्यात त्या बोलत होत्या.
या मेळाव्यात करमाळा तालुक्यातील शिक्षक, पदवीधर, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. मिळालेला हा भरघोस पाठिंबा अत्यंत दिलासादायक आणि बळ देणारा असल्याचे सांगत डॉ. स्मिता जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. बैठकीदरम्यान पदवीधरांच्या रोजगाराच्या संधी, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आणि तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठीच्या प्रचार रणनीतीवर सविस्तर मंथन करण्यात आले.
या मेळाव्यास करमाळा परिसरातील प्रमुख नेते व मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली होती. यामध्ये माजी आमदार सुनीलभाऊ कुरजतकर, मकाई साखर कारखान्याचे माजी चेअरमन व भाजपा युवा नेते दिग्विजय बागल, भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चिवटे, विद्याविकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, दूध संघाचे माजी संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले, पंचायत समिती सभापती पूजाताई ढेरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, भाजपा तालुकाध्यक्ष जगदीश अग्रवाल, उपनगराध्यक्ष अतुल फंड, नगरसेवक दीपक चव्हाण, माजी प्राचार्य जयप्रकाश बिले, प्राचार्य मिलिंद फंड, मंडल अध्यक्ष काकासाहेब सरडे आणि सचिन पिसाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी तालुक्यातील शिक्षक, पदवीधर बंधू-भगिनी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याच्या अत्यंत नेटके आणि उत्तम नियोजनाबद्दल डॉ. स्मिता जाधव यांनी आयोजक व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.