Veer Dam : वीर धरणामधून नीरा नदीत विसर्ग

नीरा खोऱ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
solapur news
Veer Dam : वीर धरणामधून नीरा नदीत विसर्गfile photo
Published on
Updated on

Discharge from Veer Dam into Nira River

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा नीरा खोऱ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पूरनियंत्रणासाठी शुक्रवारी (दि. २४) वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात २४ हजार २८५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

solapur news
Solapur News : उजनीतील पाणीसाठा पोहोचला ७५ टक्क्यांवर

त्यामुळे नीरा नदीचे पाणी भीमा नदीत मिसळून भीमा नदी ही आता दुथडी भरून वाहणार आहे. यात वीर धरणाच्या सांडव्यातून २३ हजार १८५ क्युसेक तर अतिवाहकाद्वारे १,१०० क्युसेक पाण्याच्या विसर्गाचा समावेश आहे.

solapur news
School News : दहा हजार शाळेत नाही स्वच्छतागृह

दौंडमधून ३६ हजार २०० क्युसेकने पाण्याचा आवक धरणात येत आहे. उजनीतून सीना माढा उपसा सिंचन योजनेसाठी २८० क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ९० क्युसेक, बोगद्यातून ९०० क्युसेक, मुख्य कालव्यातून दोन हजार क्युसेक असे एकूण तीन हजार २७० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news