

सोलापूर : सोलापूर, पुणे, अहिल्यानगरसाठी जीवनदायिनी ठरलेल्या उजनी धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत असून, शनिवारी दि. २५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुळशी धरणासह पुणे घाटमाध्यावरील पावसाने दौंडकडे विसर्ग वाढला आहे. आज रविवारी सायंकाळी उजनीतील पाणीपातळी ही ८५ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. धरणात एकूण पाणीसाठा ही १०३ टीएमसी इतका असून, उपयुक्त पाणीसाठाही ३९ टीएमसी इतका आहे.
यंदा उन्हाळाही अधिक कडक असल्याने उजनीतील पाणीपातळी ही उणे २९ टक्क्यांपर्यंत खाली गेले होते. दरम्यान, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भीमा खोऱ्यात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठाही उणे वरून अधिक पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. मुळशी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने दौंड येथे पाण्याची पातळी ही ५०१ मीटर इतकी असून, ७५ हजार क्युसेकचा विसर्ग धरणात येऊन मिसळत आहे.