Dhairyashil Mohite-Patil | दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली उद्या आक्रोश मोर्चा
Dhairyashil Mohite-Patil | दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
Published on: 
Updated on: 

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत आहे. पण महायुती सरकार दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत आणि उपाययोजना करण्यास चालढकल करत आहे, असा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने फडणवीस सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माढ्याचे खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिली.

सरकार विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी गुरुवारी (दि. २४) पंढरपूर येथे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. अभिजित पाटील, आ. राजू खरे, जिल्हा अध्यक्ष वसंत देशमुख, नागेश फाटे, संजय पाटील-घाटणेकर, दीपक वादेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

खा. मोहिते-पाटील म्हणाले की, यावर्षी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. पावसाअभावी खरीप पिके जळून गेली आहेत. तर उसाची वाढ खुंटली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तरीही सरकारचे दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष आहे. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी शनिवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सरकार विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

हा मोर्चा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. मोर्चामध्ये माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. राजू खरे यांच्यासह सर्व आमदार आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news