दौंड-कलबुर्गी ‘शटल’ धावणार सुसाट

ताशी 48 किमी वेग; प्रवाशांना दिलासा
Solapur News
दौंड-कलबुर्गी ‘शटल’ धावणार सुसाटPudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : विजय थोरात

दौंड-कलबुर्गी-दौंड दरम्यान धावणार्‍या ‘शटल’चा वेग वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे ताशी 48 किलोमीटर वेगाने ती धावणार आहे. त्यामुळे प्रवास सुसाट होणार आहे. दरम्यान, दौंड-कलबुर्गी (गुलबर्गा)-दौंड पॅसेंजर दौंड येथून पहाटे पाच वाजता निघेल. सोलापूरला सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन 8 वाजून 45 मिनिटांनी कलबुर्गीकडे रवाना होईल. कलबुर्गी येथे सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल. कलबुर्गी येथून दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी निघेल. सोलापूरला 6 वाजून 40 मिनिटांनी येईल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन 6 वाजून 25 मिनिटांनी दौंडकडे रवाना होईल. दौंड येथे रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल.

Solapur News
दौंड शहरात अवैध धंदे पुन्हा जोमात

28 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान प्रती सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवारी दिवाळी विशेष पॅसेंजर म्हणून धावणार आहे. भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अक्कलकोट रोड, बोरोटी, दुधनी, गाणगापूर रोड या रेल्वेस्थानकांवर थांबणार आहे. या गाडीस दहा जनरल, दोन एसएलआर असे एकूण 12 डबे आहेत. यामुळे नियमित प्रवास करणारे प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी वर्ग, तीर्थक्षेत्रांना भेट देणारे भाविक, शेतकरी, दूध विक्रेते, मासिक पासधारक यांचा प्रवास सुसाट होणार आहे.

Solapur News
दौंड तालुका बनतोय पुण्याचा कचरा डेपो

पायाभूत सुविधा पूर्णत्वाकडे

सोलापूर विभागात दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सोलापूर विभागाने आपल्या हद्दीतील रेल्वे ट्रॅकच्या देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली होती. त्यानुसार वाडी-दौंड दरम्यान ट्रॅकवर दर दोन किलोमीटर अंतरावर डबल डिस्टन्स सिग्नल बसविण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही अडथळ्यांविना सर्वच गाड्या आगामी काळात वेगाने धावणार आहेत. सर्व पायाभूत सुविधांची कामे पूर्ण होताच टप्प्याटप्प्याने मेल, एक्स्प्रेस व पॅसेंजरचा वेग वाढविण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news