दौंड शहरात अवैध धंदे पुन्हा जोमात

पोलिसांचे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
illeagal bussiness
अवैध धंदे जोमात File photo
Published on
Updated on

दौंड पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंद्याने पुन्हा डोके वर काढले आहे. मात्र, याकडे दौंड पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय शहरात अनेक गुन्ह्यांतील पोलिसांना हवे असलेले गुन्हेगार राजरोसपणे फिरत आहेत. परंतु, पोलिसांना ते सापडत नाहीत, ही बाब विचार करायला लावणारी आहे. शहरातील अवैध धंद्यांकडे पोलिसांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सुजाण नागरिकांकडून करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी दौंड शहरात मटका, जुगाराचा क्लब, हातभट्टी विक्री, वेश्याव्यवसाय व इतरही अवैध धंद्यांवर यापूर्वीचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी लगाम लावला होता. परंतु, त्यांची बदली झाली. त्यानंतर दौंड पोलिस ठाण्यात अनेक पोलिस कर्मचारी नव्याने रुजू झाले. याचाच फायदा अवैध धंदेवाल्यांनी घेतला. काही जणांना शहरात कोठे अवैध धंदे चालतात, हे चांगलेच माहिती आहे. महिन्याकाठी त्यांना त्यांच्याकडून चांगलाच मलिदा मिळतो. वेश्याव्यवसाय पूर्णपणे बंद असल्याचे सांगितले जाते. परंतु, पोलिसांच्या वरदहस्ताने शहरातील काही भागांत हा व्यवसाय खुलेआमपणे चालू आहे. याची माहिती असतानाही काही पोलिस याकडे जाणूनबुजून काणाडोळा करतात. सध्या महिलांबाबतीत वेगवेगळ्या घटना ऐकायला येतात. मग, महिलांबाबत एखादी अनुचित घटना घडल्यावरच पोलिस जागे होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरात गुन्हेगारांचा राजरोसपणे वावर

मागील काळात पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शहरातील वेश्याव्यवसाय व अवैध धंद्यांवर वचक बसवला होता. परंतु, सध्या दौंड पोलिस ठाण्यात अनेक अधिकारी व कर्मचारी नवीन आले आहेत. त्यामुळे हे सर्व अवैध धंदे जोमाने सुरू झाले आहेत. आगामी काळात निवडणूक असल्याने या अवैध धंदे करणार्‍यांना काही राजकीय वरदहस्तसुद्धा लाभला आहे. शहरात अनेक गुन्ह्यांतील पोलिसांना हवे असलेले गुन्हेगार राजरोसपणे फिरत आहेत. परंतु, पोलिसांना हे सापडत नाहीत, ही बाब विचार करायला लावणारी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news