Board examination: दहावीच्या बोर्ड परीक्षेला उद्यापासून सुरुवात

188 केंद्रावर 64 हजार विद्यार्थी देणार परीक्षा
10th Exam
SSC ExamFile Photo
Published on
Updated on

सोलापूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावी परीक्षा उद्या शुक्रवारी (दि.20) पासून होणार आहे. ही परीक्षा जिल्ह्यातील 188 परीक्षा केंद्रावर होत असून, परीक्षेला 64 हजार 454 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी शिक्षण, जिल्हा परिषद, महसूल, पोलिस प्रशासन समन्वयातून काम करीत असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय सातभरारी पथक तयार करण्यात आलेली आहेत.

प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गैरमार्गाचा वापर करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आह. शाळा परिसर, सर्व परीक्षा केंद्र परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर पेपरच्या वेळेत बंद ठेवणेबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना दिलेल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news