शासकीय योजनांचा सर्वसामान्यांना लाभ मिळवून द्या

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन; विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींशी साधला संवाद
Solapur News
सोलापूर ः शासकीय विश्रामगृहात आढावा घेताना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, शीतल तेली उगले, एम. राजकुमार आदी.Pudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्याचा विविध क्षेत्रात विकास करण्यासाठी सर्व अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत. कृषी, सिंचन, शैक्षणिक, औद्योगिक, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यटन क्षेत्रासह अन्य क्षेत्रात सर्वांगीण विकास घडवून आणून त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून द्यावा, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंगळवारी (दि. 15) केले. सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत राधाकृष्णन बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त शितल उगले तेली, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपस्थित होते.

Solapur News
सोलापूर : श्रीक्षेत्र मार्डी येथील श्री नागनाथ यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात

राज्यपाल राधाकृष्णन यांनी जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या उजनी धरणासह विविध मोठे, माध्यम व लघु पाणी प्रकल्पाची माहिती घेतली. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची माहिती घेताना सर्वसामान्य रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयामधील एमआरआय, सीटी स्कॅन मशीन, एक्स-रे यासह अन्य मशीनरी व्यवस्थितपणे सुरू असली पाहिजे यासाठी संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. प्रारंभी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जिल्ह्याच्या विविध विकासात्मक कामाची माहिती दिली.

वारकर्‍यांना चांगल्या सुविधा द्या ः राज्यपाल

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत मंदिर संवर्धनासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्याप्रमाणेच सर्वसामान्य भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन सुलभ व लवकर होण्यासाठी प्रशासनाने सादर केलेला व शासनाने मंजूर केलेला दर्शन मंडप व स्काय वॉक उपक्रमाचे कौतुक करून भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी सुचित केले.

Solapur News
सोलापूर-मुंबई वंदे भारतमध्ये बिघाड

लोकप्रतिनिधी, उद्योजक, जिल्हाप्रमुख, वकिलांशी संवाद?

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देणार्‍या उद्योजक, वकील, खेळाडू, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे जिल्हा प्रमुख यांच्याशी राज्यपाल राधाकृष्णन यांनी संवाद साधला. यावेळी सर्व संबंधित मान्यवरांनी नियमित विमान सेवा सुरू करणे, बोरामणी येथील कार्गो विमानतळ सुरू करणे, हातमाग उद्योगाला केला जाणारा वीजपुरवठा दर कमी करणे, डॉक्टर्सना संरक्षण असणे, दररोज पाणीपुरवठा शहराला करणे, ड्रेनेज सिस्टीम चांगली करणे, शासकीय रुग्णालयात मशिनरी नियमित सुरू ठेवणे, हद्दवाढ भागाला विशेष निधी देणे, आयटी व गारमेंट पार्क निर्माण करणे, ज्युनिअर वकिलांना स्टायपेंड देणे, बिडी कामगारांना शासकीय योजनांचा लाभ देणे जिल्ह्यातील कामगारांच्या नोंदी करून घेणे आधी मागण्या सूचना व समस्या राज्यपाल महोदय यांच्याकडे मांडल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news