कोल्हापूरहून ज्योत आणताना अपघातात डिकसळचे १२ तरुण जखमी

Solapur News | जांभुळवाडी पाटी येथे टेम्पोची पिकअपला धडक
Jambhulwadi incident 12 youth injured
जांभुळवाडी पाटी येथे टेम्पोची पिकअपला धडक होऊन झालेल्या अपघातात डिकसळचे १२ तरुण जखमी झाले.Pudhari Photo
Published on
Updated on

सांगोला: पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर येथून भवानी ज्योत घेऊन येताना वाटेत थांबलेल्या पिकअपला भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात डिकसळ (ता. सांगोला) येथील श्री लक्ष्मी देवी नवरात्र उत्सव मंडळाचे १२ तरुण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सत्यजित विष्णू यादव (वय २०) असे त्याचे नाव आहे. ही घटना गुरुवार पहाटे ३ च्या सुमारास विजापूर - गुहागर मार्गावरील जांभुळवाडी पाटी (ता. कवठेमहांकाळ, जि.सांगली) येथे घडली.

यात विजय कांबळे, आबासो पारसे, संजय जगताप, अविनाश काळे, विश्वास पाटील, चैतन्य जाधव, सचिन कारंडे, विकास करांडे यांच्यासह आणखी तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जत येथील खासगी व ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, अपघातानंतर तरुणांनी सकाळी ७ वा.पूर्वीच भवानी ज्योत गावात घेऊन दाखल झाले आहेत.

डिकसळ येथील लक्ष्मी देवी नवरात्र उत्सव मंडळाचे सुमारे १३० तरुण भवानी ज्योत आणण्यासाठी बुधवारी चारचाकी दुचाकीवरुन कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिरात गेले होते. गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास ज्योत घेऊन परत येताना पिकअप जांभुळवाडी पाटी याठिकाणी थांबली होती. त्यादरम्यान नागजकडून विजापूरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने पिकअपला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात घडला.

दरम्यान, अपघात घडल्यानंतर नाना हालंगडे, माजी सरपंच चंद्रकांत करांडे, अशोक करताडे, संदीप करांडे, ज्ञानेश्वर मागाडे यांच्यासह अन्य युवकांनी जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल केले.

Jambhulwadi incident 12 youth injured
सोलापूर-मुंबई वंदे भारतमध्ये बिघाड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news