Bhakari : भाकर दुर्मीळ होणार; ज्वारीचा प्रतिकिलो दर शंभरावर जाणार

दुष्काळामुळे राज्यात पिकाची पेरणी केवळ २१ टक्के; ज्वारीचे कोठार सोलापूर जिल्ह्यातही पेरा घटला
Bhakari
Bhakari : भाकर दुर्मीळ होणार; ज्वारीचा प्रतिकिलो दर शंभरावर जाणारfile photo
Published on: 
Updated on: 

Bhakari will become scarce; price of sorghum will go above 100 per kg

सोलापूर : सुमीत वाघमोडे पावसाने फिरवलेली पाठ, फळ पिकांमधून मिळणारा अधिकचा पैसा या व अशा अनेक कारणांमुळे यंदा ज्वारी पिकाची पेरणी केवळ २१ टक्के क्षेत्रात झाली आहे. उत्पादन कमी होण्याचा अंदाज असल्याने यंदा ज्वारीचा दर किलोला शंभर रुपयांवर जाणार असल्याचे भाकीत तज्ज्ञांनी केले आहे. ज्वारीचे कोठार असलेल्या सोलापूर जिल्ह्यातही चालू हंगामात ज्वारीचा पेरा घटला आहे.

Bhakari
Jalna Drought : जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात टँकरने गाठली शंभरी

त्यामुळे ज्वारीचे पीक कमी होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने अहिल्यानगर, सोलापूर, बीड, सांगली, सातारा, पुणे, जळगाव, धुळे तसेच धाराशिव, परभणी आणि जालना जिल्ह्यांत ज्वारीचे पीक घेतले जाते.

सोलापूर हा राज्यातील ज्वारी उत्पादनाचा प्रमुख जिल्हा आहे. यंदा (२०२६-२७) पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रब्बी ज्वारीच्या पेरणीला मोठा फटका बसला आहे. राज्यात १४ नोव्हेंबरपर्यंत सरासरी १४.९५ लाख हेक्टर क्षेत्रापैकी केवळ २.०३ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. दुष्काळामुळे ज्वारीचे क्षेत्र ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घटण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

Bhakari
Jalna News : मक्याच्या गंजी जळून खाक

जगभर ज्वारीचा पुरवठा करणाऱ्या आणि ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातच ज्वारीची अशी अवस्था झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. जिल्ह्याची ओळख असणारी मालदांडी, गुळभेंडी, ज्वारीचे वाण तर सध्या औषधालाही पेरलेले दिसून येत नाही. ज्वारीच्या तुलनेत अधिक उत्पन्न देणाऱ्या ऊस, फळ पिकांकडे ज्वारी उत्पादक वळले आहेत. त्यातच यंदाची दुष्काळी परिस्थिती यामुळेच यंदा ज्वारीचे कोठार असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घटून प्रति किलो ज्वारीच्या किमती प्रचंड वाढत आहेत.

रब्बी हंगाम धोक्यात यंदा जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत फक्त १२७.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रब्बी पेरणीसाठी यंदा जमिनीत पुरेसा ओलावाच निर्माण न झाल्याने ज्वारीचा पेरा घटला. तसेच विहिरी, बोअरवेल आणि स्थानिक जलस्रोतांची पाणी पातळी खालावल्याने अनेक शेतकऱ्यांना पेरणी करणेही शक्य झाले नसल्याने ज्वारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.