Jalna Drought : जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात टँकरने गाठली शंभरी

नोव्हेंबरमध्ये असे तर मार्च-एप्रिलमध्ये कसे?
Jalna Drought
Jalna Drought : जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात टँकरने गाठली शंभरीfile photo
Published on: 
Updated on: 

Jalna Drought: Tanker traffic reaches 100 in the district in the dead of winter

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ७९ गावे व ४९ वाड्यांना १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नोव्हेंबर महिन्यातच टँकरची संख्या शंभरावर पोहचल्यामुळे आगामी मार्च व एप्रिल महिन्यात जिल्ह्याचा पाणीप्रश्न गंभीर बनणार असल्याचे दिसत आहे.

Jalna Drought
Jalna News : सदर बाजार पोलिसांनी गावठी कट्टयासह तरुणांना केले जेरबंद

जालना जिल्ह्यातील सात मध्यम व ६० लघु प्रकल्पांतील पाण्याने नोव्हेंबर महिन्यातच तळ गाठला आहे. जिल्ह्यातील ६७ प्रकल्पांत केवळ दहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बहुसंख्य लघु प्रकल्प नोव्हेंबर महिन्यातच कोरडे पडू लागल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ७९ गावे व ४९ वाड्यांत राहणाऱ्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी शंभर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

आगामी काळात टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असल्याने आगामी काळ जालनेकरांची कसोटी पाहणारा राहणार आहे. जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पाणी प्रश्नाबाबत दावे प्रतिदावे करीत असले तरी २०१२ च्या दुष्काळातून नेते व नागरिकांनी धडा घेतला नसल्याचे दिसत आहे. जालना जिल्ह्यात हातवण प्रकल्पासह इतर अनेक प्रकल्प गेल्या कित्येक वर्षापासुन रखडले आहेत. या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात राजकीय नेत्यांना अपयश आल्याची चर्चा या निमित्त होताना दिसत आहे.

Jalna Drought
जालना बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले

घाणेवाडीत अत्यल्प पाणी

जालना शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावातही पाणी पातळी अत्यल्प राहिली आहे. यामुळे आगामी काळात नवीन व जुना जालना भागातील रहिवाशांची भिस्त जायकवाडीच्या पाण्यावर राहणार आहे.

जिल्ह्यातील पाणीप्रश्नाबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. आगामी जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकत्र येऊन उपाययोजना करणे गरजेचे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.