बार्शी : काळवीटाची शिकार करुन मांस खाणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक

बार्शी
बार्शी

: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घोळवेवाडी वन परिक्षेत्रात काळवीटाची शिकार करुन त्याचे मांस खाणा-या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. बळीराम वामन शिंदे, व  सोमनाथ नवनाथ घोळवे (रा. दोघेही घोळवेवाडी ता. बार्शी) या दोघांविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिकची माहिती अशी की, बळीराम शिंदे आणि सोमनाथ घोळवे हे दोघे काळवीटाची शिकार करुन त्याचे मांस खात होते. या वेळी पोलिसांना शेडमधील कपाटात मृत काळवीटाचे शरीरापासुन वेगळे केलेले मुंडके डोके, पायाचे तुकडे, तसेच पातेल्यामध्ये शिजवलेले मटन आढळून आले. शिवाय,  शिकारीसाठी वापरले जाणारे जाळे फासे, विळी, कु-हाड, सुरा इ.साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

दोघांना बार्शी न्यायालयात हजर केले असता आज दि.११/१२/२०२३ पर्यंत पोलिस / फॉरेस्ट कस्टडी देण्यात आली आहे. उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहायक वनसंरक्षक बाबा हाके यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अलका करे ,वनपरिमंडळ अधिकारी जहाँगीर खोंदे,इरफान काझी,  बालाजी धुमाळ, महावीर शेळके, सचिन पुरी, आयेशा शेख,  शहाबाज मुल्ला, राहुल खोगरे, आदींनी  केली आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news