

Social Media Viral Post on Hagawane Family Viral Text on Fortuner
सोलापूर : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. त्यातच सोलापुरात एका मालकाने हागवणे कुटुंबीयांनी फॉर्च्यूनर गाडीला बदनाम केल्याचा मजकूर आपल्या फॉर्च्यूनर गाडीवर छापून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गाडीवरील हा मजकूर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.
पिंपरी - चिंचवड येथील हुंडाबळी प्रकरणातील हगवणे प्रकरणातील फॉर्च्यूनर गाडी चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, सोलापुरातील एका फॉर्च्यूनर वापरणाऱ्या मालकांनी आपलं दुःख गाडीवर लिहून व्यक्त केले आहे. आजकाल हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर मधून उतरला की संशय येतोय, म्हणून अतुल खूपसे पाटील यांनी गाडीवर वेगळा मजकूर लिहिला आहे. हा मजकूर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.
'तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं, मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा, हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय, गाव सगळा अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय, पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धु धु धुतलंय, असा गाडीवर मजकूर लिहून खूपसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, हगवणे कुटुंब यांना फॉर्च्युनर देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते देण्यात आलेल्या चावीवरून अतुल खूपसे यांनी चिमटा काढला आहे. राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी हगवणे कुटुंबीयांच्या मोठ्या सुनेच्या तक्रारीचा विचार केला असता तर वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या रोखता आली असती. अतुल खूपसे यांनी फॉर्च्यूनर गाडीवर लिहिलेल्या मजकुराच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडल्या आहेत.