Apulki Pratishthan: आपुलकी प्रतिष्ठानकडून ३९० विद्यार्थ्यांना ९० हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य व सायकलींचे वाटप

Apulki Pratishthan: आपुलकी प्रतिष्ठान आणि देणगीदारांच्या सहकार्याने सांगोला शहर व तालुक्यातील ३९० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि सायकलींचे वाटप करण्यात आले.
Apulki Pratishthan
Apulki PratishthanPudhari
Published on
Updated on

Apulki Pratishthan: सामाजिक बांधिलकी जपत आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला व विविध देणगीदारांच्या सहकार्याने शहर व तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व सायकल वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकूण ३९० विद्यार्थ्यांना सुमारे ९० हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य व सायकली भेट देण्यात आल्या.

या उपक्रमातून सांगोला शहर व तालुक्यातील ३९० विद्यार्थ्यांना सुमारे ३१ हजार रुपये किमतीचे विविध शालेय साहित्य वितरित करण्यात आले. तसेच शिक्षणासाठी दूरवरून पायी प्रवास करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची गैरसोय दूर करण्यासाठी सायकलींचे वाटप करण्यात आले.

आपुलकी प्रतिष्ठान
आपुलकी प्रतिष्ठान

यामध्ये विविध भागांतून जमा झालेल्या १८ जुन्या सायकलींची दुरुस्ती करून त्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. या सायकलींच्या दुरुस्तीसाठी सुमारे २२ हजार ५०० रुपये खर्च करण्यात आला. याशिवाय ३६ हजार रुपये किमतीच्या ११ नवीन सायकली गरजू विद्यार्थ्यांना भेट देण्यात आल्या. अशा प्रकारे शैक्षणिक साहित्य, जुन्या सायकलींची दुरुस्ती आणि नवीन सायकलींचे वाटप यावर एकूण सुमारे ९० हजार रुपये खर्च करण्यात आला.

आपुलकी प्रतिष्ठान
आपुलकी प्रतिष्ठान

या उपक्रमासाठी काकासाहेब चन्ने, राकेश ढाणके, बापूसाहेब ठोकळे, राजकुमार बनसोडे, स्वरूप अरबळी, दादा खडतरे आणि विलास नलवडे गुरुजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच अण्णासाहेब इंगवले यांनी वाढदिवसानिमित्त २ सायकली, महादेव दिघे (वाढेगाव) यांनी २ सायकली, सिद्धी मोटर्सचे दीपक शिंदे यांनी १ सायकल, तर एका अनामिक देणगीदाराने १ सायकल देणगी स्वरूपात दिली. याशिवाय अनेक दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदतीचा हातभार लावला.

हा उपक्रम सांगोला शहरासह जि. प. प्रा. शाळा बंडगरवाडी (शिरभावी), जि. प. प्रा. शाळा बागलवाडी, जि. प. प्रा. शाळा सांगोलकर वस्ती (तरंगेवाडी), जि. प. प्रा. शाळा शेळके वस्ती (शिवणे) आणि जि. प. प्रा. शाळा खांडेकर वस्ती (नवी, महूद) येथील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला.

Apulki Pratishthan
Rahul Gandhi: 'धर्मेंद्र प्रधानांना हटवा', PM मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधी आक्रमक; सरकारसमोर ठेवल्या 3 मागण्या

तसेच डोंगरगाव परिसरातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन एकल महिलांचा सर्वेक्षण उपक्रम राबविताना त्यांच्या शिक्षण घेणाऱ्या मुलांसह गावातील इतर गरजू विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्य घरपोच देण्यात आले.

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करून त्यांची शैक्षणिक वाटचाल अधिक सुकर व्हावी, या उद्देशाने आपुलकी प्रतिष्ठानने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news