Akkalkot Guru Purnima| गुरुपौर्णिमा उत्सवाची वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानतर्फे जय्यत तयारी

गुरुपौर्णिमा उत्सवाची वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानतर्फे जय्यत तयारी
Akkalkot Guru Purnima
Akkalkot Guru Purnima
Published on
Updated on

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष मंदिरात बुधवार, दि. २९ होणाऱ्या रोजी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

श्री गुरुपौर्णिमा असून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेस अनन्य साधारण महत्त्व आहे. भाविक येथील वटवृक्ष निवासी स्वामींना गुरू मानून यादिवशी दर्शनाकरीता विशेष गर्दी करतात. गुरूंचे गुरू, सदगुरुंचे गुरू म्हणजे येथील ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज होय.

Akkalkot Guru Purnima
Ashadhi Wari 2026: आषाढी वारी पंढरीची; उलाढाल ३०० कोटींची

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात नित्य नियमाने होणारी काकडआरती पहाटे ४ वाजता होईल. सालाबादाप्रमाणे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता व भाविकांचे दर्शन सुलभतेने होणेकरीता गुरुपौर्णिमेरोजी मंदिर रात्री २ वाजता उघडण्यात येईल. यादिवशी स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत.

सकाळी ११ वाजता नैवेद्य आरती होईल. त्यानंतर सर्व स्वामी भक्तांसाठी दुपारी १२ ते ३ यावेळेत देवस्थानच्या मैंदर्गी- गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे भोजन महाप्रसादाची सोय देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.

रात्री ७:५० ते रात्री ८:३० या वेळेत श्रींची शेजारती होईल. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता महिला व पुरुष भक्तांची स्वतंत्र दर्शन रांग, पोलिस बंदोबस्त, वाहतूक पोलिस बंदोबस्त, बॅरेकेडींग दर्शन रांग, दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय, प्रथमोपचार केंद्र, वैद्यकीय सेवा, व्हीलचेअर इत्यादी सुविधांच्या माध्यमातून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या

Akkalkot Guru Purnima
Solapur Mother and Daughter Death |कौटुंबिक वादातूनच गेला माय-लेकीचा जीव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news