Ahilyadevi Holkar Memorial | अहिल्यादेवी होळकर स्मारक १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

त्रिशताब्दी जयंतीसाठी ५० लाखांचा निधी जाहीर
Ahilyadevi Holkar Memorial |
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा आढावा घेतला. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, आमदार देवेंद्र कोठे, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे व अन्य.Pudhari Photo
Published on
Updated on

Ahilyadevi Holkar Memorial

सोलापूर : सोलापूर विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे बांधकाम 15 जुलै 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. विद्यापीठास भेट देऊन स्मारकाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी हे आदेश दिले.

यावेळी विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त १ ऑगस्ट रोजी स्मारकाचे उद्घाटन करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. तसेच, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव साजरा करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.पालकमंत्री गोरे यांनी स्मारकाच्या बांधकामाची गुणवत्ता आणि वेळेत पूर्णत्वासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.

Ahilyadevi Holkar Memorial |
मोठी बातमी: अहमदनगरचं नामांतर आता अहिल्यानगर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

यावेळी आमदार देवेंद्र कोठे, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, सिनेट सदस्य तथा भाजपचे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्मारक समितीचे सदस्य सर्वश्री माऊली हळणवर, शिवाजी कांबळे, शिवाजी बंडगर, अमोल कारंडे, सोमेश्वर क्षीरसागर, सुभाष मस्के, नागेश वाघमोडे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी ५० लाखांचा निधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती वर्ष असून वर्षभर विद्यापीठाच्यावतीने जिल्हाभरात विविध कार्यक्रम राबविण्यासाठी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी निधीची मागणी केली. यावेळी तात्काळ पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समिती मधून ५० लाखांचा निधी जाहीर केला. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर व स्मारक समितीच्या सदस्यांनी पालकमंत्र्यांचे यानिमित्त आभार मानले.

तलावाच्या सुशोभीकरणासाठी मदत

विद्यापीठाच्या वनविभागाच्या आरक्षित जागेचा प्रश्न देखील मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी काढण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात असलेल्या तलावाच्या सुशोभीकरणासाठी देखील निश्चित मदत करू, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Ahilyadevi Holkar Memorial |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाला अजितदादांना का बोलवणार नाही? पडळकरांंचं सूचक उत्तर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news