पंढरपुरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

पंढरपुरात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई
Action on illegal sand transport in Pandharpur
पंढरपूर : महसूल प्रशासनाने कारवाई करत वाळूचे चार तराफे नष्ट केले. यावेळी उपस्थित महसूल अधिकारी व कर्मचारी.File Photo

पंढरपूर : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात पंढरपूर महसूल विभागाच्या भरारी पथकाने पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणारे दोन लाख रुपयांचे चार तराफे नष्ट केले. शिरढोण येथे वाळू उपसा करताना एक जेसीबी ताब्यात घेतल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

Action on illegal sand transport in Pandharpur
Sri lanka Cricket : श्रीलंकन मुख्‍य प्रशिक्षक सिल्‍वरवूडचा राजीनामा

वाळूची अवैध वाहतूक करणार्‍यांविरोधात कारवाई

पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इतापे व तहसीलदार लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे सुमारे दोन लाख किमतीचे चार तराफे पूर्णपणे नष्ट केले. कृष्णा नाना नेहतराव यांच्यावर गुन्हा दाखल केला. शिरढोण (ता. पंढरपूर) येथून नदीपात्रालगत वाळू चोरी करत असताना एक जेसीबी पकडून तो शासकीय धान्य गोदाम येथे जमा केला. त्याचबरोबर पंढरपूर येथील गाढवावरून वाळू चोरी करणार्‍या व्यक्तींविरुद्ध चॅप्टर केसची कारवाई प्रस्तावित केल्याचे तहसीलदार लंगुटे यांनी सांगितले. या भरारी पथकात मंडल अधिकारी विजय शिवशरण, तलाठी अमर पाटील, प्रमोद खंडागळे, श्रीकांत कदम, महेश कुमार सावंत, गणेश पिसे, प्रशांत शिंदे, वाहन चालक नितीन काळे तसेच पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सहभागी होते.

Action on illegal sand transport in Pandharpur
पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना झटका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news