बालिकेचे अपहरण! आरोपी 3 तासांत जेरबंद

सोलापुरातील घटना
Abduction of the girl! Accused jailed within 3 hours
बालिकेचे अपहरण! आरोपी 3 तासांत जेरबंद File Photo
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

बांधकाम मजूर असलेल्या त्या नराधमाची ‘ति’च्यावर वाईट नजर होती. तिला फूस लावून त्याने अखेर तिचे अपहरण करून तिला पळवून नेले. जेमतेम 14 वर्षे तीन महिने वय असलेल्या बालिकेचा तपास करण्याचे कडवे आवाहन सदर बाझार पोलिसांनी यशस्वीपणे पेलले अन् सोलापुरातील सात रस्ता परिसरातील मुस्लिम कब्रस्तान स्मशानभूमी येथून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अपह्त बालिकेची त्यांच्या तावडीतून सुटका केली. शुक्रवारी (दि. 11) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सदर बाझार पोलिस ठाण्यात एक गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल झाली होती. त्यावरून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍याच्या विरोधात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

Abduction of the girl! Accused jailed within 3 hours
Crime News | तरुणाचे अपहरण करून दिले सिगारेटचे चटके

पीडित अल्पवयीन बालिका मुळची सोलापुरातील आहे. मागील दोन महिन्यांपासून लग्न लावून द्या म्हणून तो बांधकाम मजूर सारखा तिचा पाठलाग करीत होता. मात्र पीडितेच्या वडिलांनी त्यास नकार दिल्याने संशयित आरोपीने पीडितेच्या घरी जात तिच्या वडिलांशी वाद घातला. त्यानंतर पिडीतेचे आई-वडील रात्री झोपले असता त्याच संधीचा फायदा घेऊन रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीचे अपहरण करून शहरातून पळ काढला. त्यानंतर या घटनेची माहिती सदर बाझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलिस अधिकारी व पेट्रोलिंग करणारे कर्मचारी, मोबाईल तसेच सदर बाझार डीबी पथकाला मिळाला. त्यांना पीडितेचा व संशयित आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले मिळाले. पथके रवाना करून अवघ्या तीन तासांतच बालिकेचा शोध घेतला.

Abduction of the girl! Accused jailed within 3 hours
कराटे शिक्षकाला 20 वर्षे सक्तमजुरी ; अल्पवयीन मुलीचे अपहरण करत केले होते लैंगिक शोषण

तपासाचे आव्हान

विविध सूत्रांकडून प्राप्त माहितीच्या आधारे कारवाईची दिशा ठरविण्यात आली. संशयित आरोपी मुलीला घेऊन कोणत्या दिशेने गेला आहे, याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक त्या मार्गाने रवाना झाले. सात रस्ता परिसरातील मुस्लिम कब्रस्तान येथून पोलिसांनी आरोपीच्या मुस्क्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून बालिकेची सुटका केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news