कराटे शिक्षकाला 20 वर्षे सक्तमजुरी ; अल्पवयीन मुलीचे अपहरण करत केले होते लैंगिक शोषण

एकूण 11 साक्षीदार तपासले
molestation
अल्पवयीन मुलीवर अत्याचार File Photo
Published on
Updated on

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेत तिचे लैंगिक शोषण केल्याच्या खटल्यात अमोल कृष्णा पांढरे (रा. भिगवण, ता. इंदापूर) या कराटे प्रशिक्षकास येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. शहापुरे यांनी 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सन 2017 पासून ही पीडिता अमोल पांढरे याच्याकडे कराटे शिकण्यासाठी जात होती. पांढरे याने तिच्याशी ओळख वाढवली. तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर 1 ऑगस्ट 2018 रोजी तिला पळवून नेले. तिच्याशी वैराग (ता. बार्शी) व पुणे येथे वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केले. भिगवण पोलिसांनी 10 सप्टेंबर 2018 रोजी आरोपी व पीडिता यांना ताब्यात घेतले होते. त्याच्याविरोधात अपहरण, पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक बी. एन. पवार यांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण 11 साक्षीदार तपासले. त्यात पीडित मुलगी, वैद्यकीय अधिकारी, पीडितेचा जन्माचा दाखला देणारे अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. आरोपीकडून पीडिता स्वइच्छेने सोबत आल्याचा बचाव करण्यात आला होता. परंतु कायद्याने अल्पवयीन मुलीची संमती ग्राह्य धरता येत नाही,

तसेच या प्रकरणात पीडितेची संमती नव्हती. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा होता. तो विवाहित असूनही त्याने हा गुन्हा केल्याचे ओहोळ यांनी न्यायालयापुढे मांडले, ते ग्राह्य धरत शारीरिक शोषणप्रकरणी न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, अपहरणप्रकरणी 7 वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, विवाहाची सक्ती केल्याप्रकरणी कलम 366 नुसार 7 वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, पोक्सोअंतर्गत 7 वर्षे सश्रम कारावास व 1 हजार रुपये दंड अशा विविध कलमांनुसार वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या. या सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. या खटल्यात सरकारी वकिलांना अ‍ॅड. स्वप्निल जगताप, उपनिरीक्षक निश्चल शितोळे, उपनिरीक्षक नामदेव नलवडे, हवालदार विजय झारगड यांचे सहकार्य झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news