सोलापूर: बंगळूरू-कलबुर्गी-बंगळूरसाठी रेल्वेच्या अतिरिक्त २० फेऱ्या | पुढारी

सोलापूर: बंगळूरू-कलबुर्गी-बंगळूरसाठी रेल्वेच्या अतिरिक्त २० फेऱ्या

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी सुटीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने कलबुर्गी-बंगळूरू दरम्यान उन्हाळी विशेष जादा २० फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुट्टीच्या काळात प्रवाशांना मोठा फायदा होणार असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

कलबुर्गी-बंगळूरू-कलबुर्गी २० फेऱ्या

गाडी क्रमांक ०६५९७ कलबुर्गी-बंगळूरू सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी १२ एप्रिल ते १४ जूनदरम्यान धावणार आहे. दरम्यान १२ एप्रिलरोजी बंगळूरूतून शुक्रवारी रात्री ११ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी कलबुर्गीला दाखल होईल. तर गाडी क्रमांक ०६५९८ कलबुर्गी-बंगळूरू सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी १३ एप्रिल ते १५ जून दरम्यान धावणार आहे.

शनिवार १३ एप्रिलरोजी सायंकाळी ५.१५ वाजता कलबुर्गीहून सुटेल. ती बंगळूरूला दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१५ वाजता दाखल होईल. या गाडीस येलहंका, डहाणू रोड, अनंतपूर, गुंतकल, आडोनी, मंत्रालयम रोड, रायचूर, यादगीर, वाडी, शाहबाद, कलबुर्गी हे थांबे असतील. गाडीची संरचना एक प्रथम श्रेणी वातानुकूलित, एक द्वितीय श्रेणी वातानुकूलित, चार तृतीय श्रेणी वातानुकूलित, दहा शयनयान, दोन सामान्य श्रेणी आणि दोन लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहे.

हेही वाचा 

Back to top button