Warkari woman accident: रस्ता ओलंडून गाडीकडे येताना ७६ वर्षीय महिला वारकर्‍याला ST बसची धडक, उपचारादरम्यान मृत्यू

अपघातानंतर एस.टी. चालक वाहन तेथेच सोडून पळुन गेल्याचे समजते
Accident
AccidentPudhari file photo
Published on
Updated on

पोखरापूर: क्रुझरमधून उतरून ७६ वर्षीय महिला वारकरी रस्ता ओलांडुन रस्त्याच्या पलीकडे लघुशंकेसाठी गेल्या होत्या. रस्ता ओलंडून परत गाडीकडे येत असताना त्यांना पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या एस. टी. बसने भरधाव वेगात धडक दिली. त्यामध्ये महिला वारकरी गंभीर जखमी होवुन उपचारादरम्या मृत्यू झाल्याची घटना दि. २३ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान मोहोळ ते पंढरपूर हायवे रोडवर चंद्रमोळी हॉटेल समोर घडली. अंजनाबाई रामलाल पाटील (वय : ६७ वर्षे) असे मृत महिला वारकर्‍याचे नाव आहे.

Accident
Solapur Accident | राँग साईडने आलेल्या कंटेनरची दुचाकीला धडक; गर्भवती पत्नीसह पतीचा जागीच मृत्यू

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, सावखेडेसिम, पो. दहिगाव, ता. यावल, जि. जवळगाव येथील पुरुष महिला असे १२ जण त्यांच्या गावातुन पंढरपूर देवदर्शनसाठी (दि.22) रोजी एस. टी. बसने आले होतो. त्यानंतर पंढरपुरात पोहचले व पंढरपूरमधून (दि. 23) ते सर्वजण खाजगी कुझर जिपने पंढरपूर ते अक्कलकोट, तुळजापूर देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करुन परत पंढरपूरकडे कुझर जिप मधुन निघाले होते. मोहोळ ते पंढरपूर हायवे रोडने पंढरपूरकडे जात असताना, मोहोळच्या पुढे चंद्रमौळी हॉटेलच्या जवळ त्यांची गाडी लघुशंकेसाठी रस्त्याच्या बाजुला थांबवली होती. त्यावेळी अंजनाबाई पाटील या रस्ता ओलांडुन रस्त्याच्या पलीकडे लघुशंकेसाठी गेल्या होत्या.

Accident
Solapur Accident | पुणे–पंढरपूर मार्गावर रस्ता दुभाजक ओलांडणे जीवावर बेतले; ट्रकच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

रस्त्याच्या पलीकडुन रस्ता दुभाजकावरुन गाडीकडे परत येत असताना रात्री ९.०० वा. चे सुमारास त्यांना मोहोळ ते पंढरपूरकडे जाणाऱ्या एस. टी. बस एम. एच. १४ एन. ई. ७१६० ने धडक दिली. त्यामध्ये अंजनाबाई पाटील गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. अपघातानंतर एस.टी. चालक वाहन तेथेच सोडून पळुन गेला होता.

Accident
Solapur Accident: बार्शीत शिक्षकासह मुलाचा अपघातामध्ये मृत्यू

शासकीय रुग्णालय डॉक्टरांनी त्यांना तपासुन उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगितले. या अपघात प्रकरणी एसटी बस चालक शिवाजी पांडुरंग निकम रा. पिराची कुरोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर याच्यावर हायगयीने, अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी जिजाबराव यादव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हेड. कॉ. अतुल क्षीरसागर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news