सोलापूर : जुना एम्प्लॉयमेंट परिसरातील चोरीचा गुन्हा २४ तासात उघडकीस; एकास अटक | पुढारी

सोलापूर : जुना एम्प्लॉयमेंट परिसरातील चोरीचा गुन्हा २४ तासात उघडकीस; एकास अटक

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : जुना एम्प्लॉयमेंट परिसरातील रोहन अपार्टमेंटमधील चार दुकाने उचकटून चोरी करणार्‍या आरोपीला शहर गुन्हे शाखेने २४ तासाच्या आत जेरबंद केले. कुमार व्रिजयन (वय ५५, रा. कोईमतुर राज्य तामिळनाडू) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.

२ फेब्रुवारीच्या पहाटे शहरातील जुना एम्प्लॉयमेंट चौकातील अपार्टमेंटमध्ये असलेली दुकाने फोडल्याची घटना घडली. यामुळे परिसरात चर्चेलाउधाण आले होते. मात्र शहर गुन्हे शाखेच्या पथकाने परिसराची पाहणी केली. त्यादरम्यान सीसीटीव्ही तपासले, त्यामधील संशयित व्यक्‍तीला भैय्या चौकातील पुलाजवळून चौकशीसाठी ताब्यात घेतले.त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून त्याने गुन्हयाची कबुली दिली. पोलिसांनी ८ हजार २०० रोकड व मोबाईल असा सुमारे १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केली.

ही कारवाई पोलीस आयुक्‍त एम. राजकुमार, उपायुक्‍त डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्राजंली सोनवणे, पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, सतिश काटे व अविनाश पाटील यांनीं केली.

Back to top button