सोलापूर : अकलूज येथे ट्रॅव्हल – दुचाकीची धडक; दोघे ठार, चालकाला अटक | पुढारी

सोलापूर : अकलूज येथे ट्रॅव्हल - दुचाकीची धडक; दोघे ठार, चालकाला अटक

अकलूज; पुढारी वृत्तसेवा : येथे ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. विकास अरुण रिसवडकर (वय 29), बॉबी ऊर्फ शुभम शिवाजी पांढरे (29) अशी मृतांची नावे आहेत.

अक्षय शिवाजी ननवरे (रा. खुडस, ता. माळशिरस) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. राहुल जगताप यांनी फिर्याद दिली. रिसवडकर व पांढरे हे सदाभाऊ चौक येथून सहकार महर्षी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याकरिता जात असताना निखिल ट्रॅव्हल्सच्या गाडीने त्यांच्या स्कुटीला धडक दिली. या अपघातात रिसवडकर व पांढरे मृत झाले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चौधरी करीत आहेत.

Back to top button