

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोलापुरातील ३० हजारांचं घरकुल प्रोजेक्ट हे आडम यांच्या मेहनतीचं फळ आहे. देशातील महागाईचा उल्लेख मोदींनी केला असता तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते सोलापुरातून बोलत होते. यावेळी त्यांनी सोलापुरात औद्योगिकरण उभारण्याची गरज असल्याचे सांगितले.
शरद पवार म्हणाले, घरकुल प्रोजेक्ट आडम यांच्या मेहनतीचे फळ आहे. मोदींनी मूळ प्रश्नांना बगल दिली. मोदींनी देशातील महागाईचा उल्लेख केला नाही.
ते म्हणाले, रोहित पवारांना नोटीस आली असेल तर चिंतेचं कारण नाही. महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा योग्य पद्धतीने आहे. ईडीची नोटीस मलाही आली होती.