‘माझ्या लहानपणी असे घर मिळाले असते तर...’ | पुढारी

‘माझ्या लहानपणी असे घर मिळाले असते तर...’

संतोष सिरसट

सोलापूर ः  कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील रेनगर येथे बांधण्यात आलेल्या 15 हजार घरांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात आले होते. या घरांच्या लोकार्पणावेळी त्यांनी आपल्या लहानपणी आपल्यालाही असे घर मिळाले असते तर, असे म्हणत ते भर सभेमध्ये भावुक झाले.

मोदी यांनी या घरांचे लोकार्पण केल्यानंतर घरांची पाहणीही केली. घरांची पाहणी केल्यानंतर मोदी भाषण करण्यासाठी व्यासपीठावर आले. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणामध्ये घरांचा उल्लेख केला. त्याचवेळी त्यांना आपल्या लहानपणाची आठवण झाली. जर आपल्या लहानपणी अशी घरे आपल्याला मिळाली असती तर, असे सांगत मोदी थोडावेळ भावुक झाले.

सोलापूरच्या चादरीचे केले कौतुक

सोलापूरची चादर कोणाला माहिती नाही, ती सगळ्यांना माहिती आहे. सोलापूरचे कपडे सगळ्यांना माहिती आहेत. पण त्या कपडे शिवणार्‍यांचा कधी कोणी विचार केला आहे का? त्या कपडे शिवणार्‍यांसाठी आपण ‘पंतप्रधान विश्वकर्मा’ योजना सुरू केली आहे. त्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

Back to top button