सोलापूर : पंतप्रधान मोदींनी थोपटली मुख्यमंत्री शिंदेंची पाठ

पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा रेनगर येथील 15 हजार घरांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात आले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींची गॅरंटी केवळ देशातच नाही तर परदेशातही चालत असल्याचा मुद्दा आपल्या भाषणात उपस्थित केला. त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केल्यानंतर मोदी यांनी शिंदे यांची पाठ थोपटली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नुकताच दावोस येथे झालेल्या वेगवेगळ्या करारामध्ये 3 लाख 53 हजार कोटींचे करार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशातील नेतेमंडळी उपस्थित होते. त्यांच्या मुखातुनही पंतप्रधान मोदींची गॅरंटीचा उल्लेख केला जात होता. त्यावेळी माझे मन भरुन आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

रेनगरच्या घरांचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे लोकार्पणही मोदींच्याच हस्ते केले जात आहे. यालाच म्हणतात मोदींची गॅरंटी. संत तुकाराम महाराजांनी म्हटलेय, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले ही म्हण मोदी यांना निश्‍चितच लागू पडते. राज्यातील अनेक योजनांचे भूमिपूजन व लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते झाले. त्यामुळे देशात यापुढेही मोदी सरकार येणार आहे. अब की बार मोदी सरकार, अब की बार 400 पार असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मोदींचे कौतुक केले. ते भाषण करुन आपल्या जागेवर बसल्यानंतर मोदींनी त्यांची पाठ थोपटली.

आडमांकडून चुकून ठाकरेंचा उल्लेख

माजी आमदार नरसय्या आडम यांनी प्रास्ताविकात चुकून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला. या दोन्ही नावांशी सारखा संबंध आल्याने चुकून ठाकरेंचे नाव आल्याचे आडम यांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news