Priyank Kharge | भाजपकडून प्रियांक खर्गे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळा दहन

Priyank Kharge
Priyank Kharge
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा अवमान केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहराच्यावतीने त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळा दहन करण्यात आले. गुरुवारी सकाळी कन्ना चौकात हे आंदोलन झाले. (Priyank Kharge)

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि काँग्रेसच्या कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. त्याबद्दल त्यांचा देशभरात निषेध होत असतानाच सोलापुरातही भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळा दहन केले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, हिंदूसंघटक सावरकरजी का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान, प्रियांक खर्गे मुर्दाबाद, भारतमाता की जय आदी घोषणा देण्यात येत होत्या.

याप्रसंगी भाजयुमो शहर अध्यक्ष डॉ. किरण देशमुख, शहर उपाध्यक्ष नागेश येळमेली, विजय कुलथे, अजित गादेकर, सरचिटणीस बसवराज गंदगे, वैभव हत्तूरे, पंकज काटकर, सिद्धार्थ मंजेली, रवि कोठमाळे, शहर उत्तर संयोजक शिवराज झुंजे, शहर मध्य संयोजक नरेंद्र पिसे, चिटणीस प्रेम भोगडे, शिवशरण साखरे, शांतेश स्वामी, माजी अध्यक्ष गणेश साखरे, संस्कार नरोटे, समर्थ व्हटकर, पवन आलुरे, निलेश शिंदे, विशाल शिंदे, अमित जनगौड, भार्गव बच्चू, उत्तर पूर्व मंडल अध्यक्ष प्रथमेश आनंदकर, पुरुषोत्तम पोबत्ती, अनिल कंदलगी, गिरीश बत्तुल, दत्तात्रय पोस्सा,प्रशांत फत्तेपुरकर, शंकर शिंदे, आनंद बिर्रु, प्रविण कांबळे, आदींसह मोठ्या संख्येने भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Priyank Kharge : क्रांतीकारकांचा अपमान सहन केला जाणार नाही

गेल्या ७० वर्षांपासून स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा अपमान काँग्रेस करीत आहे. परंतु दरवेळी जनतेने त्यांचा हा डाव हाणून पाडला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रत्येकाच्या मनात आहेत. काँग्रेसच्या अशा धोरणामुळेच तीन राज्यात त्यांनी सत्ता गमावली आहे. आजवर काँग्रेसकडून सावरकरांचा अपमान झाल्यानंतर सावरकरप्रेमी म्हणून मिरवणाऱ्या उद्धव ठाकरे गटाने त्याचा निषेध का केला नाही ? उलट त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. काँग्रेसच्या कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी हिंदूसंघटक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा अपमान करून काँग्रेसच्या परंपरागत हीन राजकारणाचा परिचय दिला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत.

डॉ. किरण देशमुख, शहर अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, सोलापूर

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news