पंढरपूर : भाविकांची पिकअप उलटली, एक ठार; 19 जण जखमी | पुढारी

पंढरपूर : भाविकांची पिकअप उलटली, एक ठार; 19 जण जखमी

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : चालकाचा ताबा सुटल्याने पंढरपूर-मोहोळ पालखी मार्गावरील तुंगत (ता. पंढरपूर) येथील वळणावर बोलेरो पिकअप जीप उलटून 1 भाविक ठार तर 19 भाविक जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी घडला. सर्व अपघातग्रस्त परभणी जिल्ह्यातील सायळा येथील आहेत.

चिमाजी टेंभुले (वय 36) असे मृत्यू पावलेल्या भाविकाचे नाव आहे. विशाल साहेबरा डोंगरे (50), विलास माणिक नवघरे (18) बवीराम बालाजी नवघरे (22), लक्ष्मण हरिभाऊ नवघरे (60), करण मोतीराम नवघरे (28), खंडु दिगंबर मते ( 25), भागवत रुस्तुम नवघरे (23), गुणाजी मारुतीराव नवघरे (65), लक्ष्मण रामचंद्र चवरे (66), कैलास तुकाराम आवाट (22), विलास लक्ष्मणराव नारवे (39), एकनाथ देवराव भुमरे (55) अशी जखमी भाविकांची नावे आहेत.

परभणी जिल्ह्यातील 23 भाविक बोलेरो पिकअपने तुळजापूर,अक्कलकोट येथून दर्शन घेऊन पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येत होते. पंढरपूर नजीक आल्यावर तुंगत येथील वळणावर अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे पिकअप जीप रस्त्याकडेला जाऊन उलटली. यात एका भाविकाचा मृत्यू झाला. काही भाविक वाहनात अडकल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमींवर पंढरपूर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत

Back to top button